एकनाथांचा जोगवा 

शांतीसुखाचा जोगवा |  सात्त्विकवृत्ती जोगवा ||
 मायभवानी जोगवा |  हा सुविचारांचा जोगवा ||
 शाकंभरी भूमी पिकवी |  कात्यायनी दंभा शमवी ||  
 शमादमाला क्षाळ माते |  माहेश्वरी भक्ता सुखवी ||
त्रिशूळ घेई पुन्हा करी |  दुरिताचा नि:पात करी ||
गरूडवासिनी दया करी |  जन अज्ञांचा उद्धार करी ||
ऐंद्रीदेवी पाऊस दे |  पृथ्वीला गर्भांकुर  दे |
सकलसुभगता मंगल दे |  अमंगलाला हाकलुन दे |
सगुण स्वरुपी दर्शन दे |  पुत्रदायिनी सुपुत्र दे  |
यशकीर्तीच्या पुढचा माते |  चिरशांतीचा सुस्वर दे  ||
संसाराचा अर्थ नवा |  प्रेमरसाचा झरा हवा  |
माणूसधर्मी आचरणाचा |  सार्वत्रिक मधुघोष हवा  ||
मायपित्यांचे प्रेम हवे |  स्नेहशील सन्मान हवे  |
तुझ्या कृपेची सदैव धारा |  घरोघरी सौभाग्य हवे ||
इतुका माझा जोगवा |  माते पदरी घालावा |
 आनंदाचा सांगावा हा |  कान देऊनी ऐकावा ||