श्रीनिवास रामानुजन 

सन १८८७ मध्ये तामिळनाडू जवळील कुंभकोणम परिसरात श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला.वयाच्या पाचव्या वर्षी त्यांना शाळेत घातले. हायस्कूलमध्ये एक हुशार मुलगा म्हणून ते प्रसिद्ध होते. शाळाकॉलेजात असताना शिष्यवृत्ती मिळवणारे रामानुजन महाविद्यालयात अनुत्तीर्ण झाले. याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना फक्त गणित हा एकच विषय आवडत होता. त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. अनेक दशांश स्थळापर्यंत ते वर्गमूळ व 'पाय' यांच्या किंमती केवळ स्मरणाने अचुक सांगत असत. अनेक अवघड पुस्तके ते ग्रंथालयातून आणून वाचीत असत. कोणत्याही घटनेचे मूळ शोधून काढण्याची त्यांची वृत्ती होती. गणित हा एकच विषय त्यांच्या आवडीचा होता. "प्युअर मॅथेमॅटिक्स" या ग्रंथाचा अभ्यास त्यांनी हायस्कूलमध्ये असतानाच केला होता. या पुस्तकात ६००० प्रमेय होती. तसेच बीजगणित, त्रिकोणमिती, भूमिती,इत्यादि अनेक विषय होते. त्या सर्वांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. त्यांना जादूचा चौरस व वर्तुळाचा क्षेत्रफळाएवढा चौरस तयार करण्याचा छंदच होता.पृथ्वीच्या विषुववृत्ताची लांबी ,पृथ्वीच्या परिघाची लांबी त्यांनी अचुक शोधून काढली होती. त्यांची बीजगणिताची सूत्रे पुस्तकाबाहेरची असत. गणिताच्या चारही शाखात त्यांनी केलेले कार्य खूप मोठे आहे. पुढे  त्यांनी संशोधनावरही काही लेख लिहिले. ते जर्नलमधून छापून आले. नंतर रामानुजन इंग्लंडला गेले. तेथे चार वर्ष राहून त्यांनी शंभर लेख लिहिले. त्या लेखांना "रामानुजन्स पेपर्स" असे म्हणतात. संख्याचे दलीकरण, मोठ्या संख्यांचे अविभाज्य भाग पाडणे, बहु अवयवी संख्याशोध, पर्यायशास्त्र व संभव शास्त्र असे या लेखांचे विषय होते. आशाप्रकारे इंग्लंडमध्ये गणितसंबंधी काम करून ते भारतात सन १९१९ रोजी परतले. आणि दुर्दैवाने क्षयरोगाच्या आजारामध्ये २६ एप्रिल १९२० मध्ये त्यांचे देहावसान झाले.