आरोग्य दिन आणि वर्ल्ड अर्थ डे 

१.]  आरोग्य दिन  <====>
जागतिक आरोग्य संघटना ही युनोची एक विशेष शाखा आहे. सात  एप्रिल १९४८ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेमध्ये जगातील जवळ जवळ १९२ देश सहभागी झाले आहेत. लोकांच्या आरोग्यविषयक जास्तीतजास्त समस्यांकडेलक्ष पुरवणे हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. संघटनेची आरोग्यविषयक कल्पना केवळ रोग व त्यावरिल उपाय यावरच मर्यादित न रहाता त्यामध्ये मानसिक, शारीरिक आरोग्याबरोबरच सामाजिक आरोग्याचाही विचार केलाजातो. जगातसहा ठिकाणी यासंघटनेची कार्यालये आहेत. द्क्षिण अमेरिकेत ब्राझिल, युरोपमध्ये कोपेनहेगेन डेन्मार्क, दक्षिण पूर्व आशियात दिल्ली, अमेरिकेत वॉशिंटन, आशियात इजिप्त, आणि पश्चिमेला फिलिपिन्स अशा सहा ठिकाणी ही कार्यालये आहेत. नविन वैद्यकीय शोधांना मदत पुरविणे, रोग निवारण व रोगनियंत्रण यासाठी वैद्यकीय मदत पुरविणे, लोकांना आरोग्यविषयक सोयीसुविधांबाबत माहिती पुरवणे, लोकांत आरोग्य विषयक जागृती निर्माण करणे,इत्यादि कामे संघटनेमार्फत केली जातात. सात एप्रिल हा संघटनेचा स्थापना दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी एक विषय निवडला जातो; त्यासंदर्भात वर्षभर विविध कार्यक्रम्मांचे आयोजन केले जाते. चर्चा, परिसंवाद, पथनट्य, फिल्म्स, प्रसारमध्यमे आदिमार्फत त्याविषयाबाबत लोकांत जागृती निर्माण केली जाते.

२.]  वर्ल्ड अर्थ डे.  <=====>
 पृथ्वीवरील पर्यावरणाची हानी रोखण्याकरिता अधिक जोमाने प्रयत्न करावे लागणार याची आठवण करून देणारा दिवस म्हणजे '' वर्ल्ड अर्थ डे ''. लोकसंख्या वाढ, वृक्षतोड, प्रदूषण, अण्वस्त्र निर्मिती,यासारख्या मानवनिर्मित कारणांनी पर्यावरणाची हानी होत असते. पृथ्वीवर निर्माण होणार्‍या या धोक्याची जाणीव आपल्या अमेरिकन बांधवांना करून देण्याच्यानिमित्ताने २२ एप्रिल १९७० या दिवशी गेलार्ड नेल्सन यांनी अमेरिकेत पहिला "अर्थ डे" साजरा केला. याच दिवशी चीन, अमेरिका, आणि रशियातील काही तुकड्या एव्हरेस्टवर गेल्या होत्या.आणि तेथील कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली. म्हणून पुढे संयुक्त राष्ट्र संघाने २२ एप्रिल हा दिवस वर्ल्ड अर्थ डे म्हणून साजरा करण्याचे ठरविले.