साहित्य अकादमी 

साहित्य विश्वातील अत्यंत मानाच्या पुरस्कारापैकी प्रतिष्टेचा पुरस्कार म्हणजे 'साहित्य अकादमी पुरस्कार'. हा पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात येतो. केंद्र सरकरच्या सांस्कृतिक विभागातर्फे मार्च १९५४ मध्ये त्याची स्थपना करण्यात आली. विविध भरतीय भाषांचे संवर्धन करणे व प्रगती करणे हेच त्यामागील उद्दीष्ट आहे. अकादमीने २२ भारतीय भाषांना मान्यता दिली आहे. प्रत्येकी १० सभासद असलेली प्रत्येक विषयांची स्वतंत्र सल्लागार समिती असून अकादमीची स्वतंत्र अशी लिखित घटना आहे. विविध कार्यक्रम, प्रकाशन याबाबत अकादमीला सल्ला देण्याच काम या समित्या करतात. अकादमीच मुख्य कार्यालय दिल्ली येथे असून मुंबई, कलकत्ता, बंगलोर,आणि चेन्नई या ठिकाणीही अकादमीची कार्यालये आहेत. विविध भाषांतील दोन लाखांहून अधिक पुस्तक असलेल अकादमीच वाचनालयही आहे. अकादमीने तीन हजारांहूनही अधिक पुस्तके प्रसिद्ध केलेली आहेत. याशिवाय ' इंडियन लिटरेचर ',' भारतीय साहित्य ', आणि ' संस्कृत प्रतिभा ' अशी नियतकालिके अकदमीतर्फे प्रसिद्ध करण्यात येतात. अकादमीतर्फे दर वर्षी सुमारे तीस प्रादेशिक ,राष्ट्रीय, व आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यात येते. तसेच ' मीट द ऑथर ', ' कवीसंधी ', कथासंधी ',' अस्मिता ', 'मुलाकात ', 'मेन अँड बुक्स ', 'थ्रू माय विन्डो ', ' अंतराळ ', यासारखे विविध कार्यक्रम केले जातात. विविध भारतीय लेखकांशी संवाद साधण्यासाठी तरूण लेखकांना अकादमीतर्फे 'प्रवास वेतन 'दिले जाते. सांस्कृतिक देवाणघेवाण योजानाही अकादमीतर्फे राबविली जाते. त्या योजने अंतर्गत भारतीय लेखक व अभ्यासकांना परदेशी पाठवल जात. आणि परदेशी लेखक व अभ्यासकांना भारतात आमंत्रित करण्यात येत. अकादमीतर्फे विविध भाषांतील सर्वोत्कृष्ट लेखनाचे २२ आणि अनुवादासाठी २२ पुरस्कार दिले जातात. सहित्यातील भरीव कामगिरीसाठी दक्षिण आशियायी अभ्यासकांना " आनंद कुमारस्वामी " फेलोशिप तसेच भारतीय भाषांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या परदेशी विद्यर्थ्यांनाही फेलोशिप दिली जाते. याशिवाय पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे अनुवाद, भारतीय साहित्यातील महत्त्वाच्या व्यक्तीबाबत माहितीपर पुस्तक, साहित्याचा इतिहास, भारतीय साहित्याचा विश्वकोश,भारतीय व अन्य साहित्याचा अनुवाद आणि चरित्रात्मक पुस्तकांच्या प्रकाशनाच कामही अकादमी करते.