स्वातंत्र्य 

मनाला भुलवणारे , मनाला गुदगुल्या करणारे स्वातंत्र्य |
वाईट किंवा चांगल्या मार्गाला नेणारे स्वतःचेच तंत्र ||
खरच का असत स्वातंत्र्य हवहवस अन भुलवणार ?|
कि फक्त असत दुरून मोहविणार ? ||
खरच स्वातंत्र्य याचा नेमका अर्थ तरी काय ? |
निसर्गानुसार स्वातंत्र्य म्हणजे नेमक आहे तरी काय ?||
स्वातंत्र्य असत बागडण्याच , आनंदाने रमण्याच |
किती वेळ किती काळ याच बंधन मात्र तुम्हाला हव ||
स्वातंत्र्य असत कुठेही जाण्याच ,अन कसही वागण्याच |
पण कधी, कुणाबरोबर हे मात्र जाणून घ्यायलाच हव ||
स्वातंत्र्य नसाव आणि नसतच तोडफोड करण्याच |
ते तर असत फक्त आणि फक्तच नव निर्मितीच ||
भांडण्याच नसत स्वातंत्र्य, नवी नाती बनवण्याच ते एक तंत्र |
हसत खेळत एकोप्याने रहण्याचा स्वातंत्र्य हाच खरा मंत्र ||
                                                                                    गौरी परूळेकर