आधार 

आधार मिळताच वृक्षाचा
क्षणात बिलगली त्याला लता |
आपुल्याच तालात ,आपुल्याच नादात
नाचत होती ती आनंदात ||
नव्हतीच पर्वा जगाची
अन उठणार्‍या वादळ वार्‍याची |
मोहवत होती त्याला हसर्‍या कळ्यांनी
अन सुखवत होती पानांच्या स्पर्शांनी ||
पण अचानक ती कोमेजली
सुटणार्‍या आधाराची जाणीव झाली |
विश्वासाने पाहिले वृक्षा
नव्हती कसलीच जाणीव त्याला ||
भरदार बाहु पसरून तुझ्यासारखाच
तो तर उभा होता ताठ |
नविन येणार्‍या टवटवीत
वेलीची पहत होता वाट ||
                                      नीला परूळॅकर