इच्छा 

आशा होती कधीतरी , तुझी माझी भेट होईल |
जीवनाच्या अंतकाळी , भेट काही होत नही ||
डोळे तुझे बोलत होते , प्रेमाची साक्ष देत होते |
जीभ मात्र गप्पच होती , शब्दच तिला सापडत नव्हते ||
मीही अबोल तेंव्हा , थोडीशी लाजळू सुद्धा |
सारे काही समजत होते , काय करावे उमजत नव्हते ||
वाटते एकदाच तू भेटावेस , म्हणावेस चुकलेच सारे |
नाही तुझ्या मनीचे खेळ सारे , मीही झुरत होतो तुझ्यामुळे ||