काव्य 

शब्दामागून शब्द सूचून तयार होते काव्य |
जसे अनुभवांच्या समुद्रावर स्वप्नांचे राज्य ||
मिळती शब्द आणि मिळती म्हणी |
त्यातून निर्माण होती सुंदर ओळी ||
सुंदर ओळींचे बनते कडवे |
त्यातून निघती अर्थ मोठ्मोठे ||
कधी असतात त्यात राजाराणी |
तर कधी दु:खी मनाची कहाणी ||
सार्‍यातून तुम्हा बोधच होई |
त्याच्या आनंदाला तोडच नाही ||
                                                   गौरी परूळेकर