खेळ 

मोठाले घर , घराला अंगण
अंगणात रिंगण
रिंगणात लंगडी खेळणार क? ||
मोठाले घर , घरापुढे बाग
बागेत पारंब्या
पारंब्यांवर सूर मारणार का ? ||
मोठाले घर , घराभोवती  मैदान
मैदानात झाड
झाडाभोवती पकडपकडी खेळणार का ? ||
मोठाले घर , घरामागे ओहोळ
ओहोळात पाणी
पाण्यात होड्या सोडणार का ? ||
मोठाले घर , घरामागे हौद
हौदात पाणी
पाण्यात दुबक्या मारणार का ? ||
मोठाले घर , घरात खोल्या
 खोल्यात अडगळ
अडगळीत लपाछपी खेळणार का ? ||
मोठाले घर , घरात पलंग
पलंगावर आजी
आजीच्या गोष्टी ऐकणार का ? ||
                                              नीला