श्रीधर केतकर 

महाराष्ट्रीय ज्ञानकोश या महान ग्रंथाचे निर्माते श्री. व्यं. केतकर यांचा जन्म २फेब्रुवारी ब१८८४ मध्ये मध्य प्रदेशातील रायपूर या गावी झाला.त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते. पण केतकरांच्या वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यु झाला. त्यापुढे त्यांच्या काकांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आवड होती. सन १९०५ मध्ये ते मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून बी. ए. झाले. आणि शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेला गेले. तेथे एम. ए., पी.एचडी. या पदव्या संपादन करून ते इंग्लंडला रवाना झाले. अमेरिका आणि इंग्लंडच्या वास्तव्यात त्यांनी "हिस्ट्री ऑफ कास्ट" आणि " हिंदूइझम" हे दोन ग्रंथ लिहून प्रसिद्ध केले. सन १९१२ मध्ये ते भारतात परत आले.
भारतात परत आल्यावर त्यांनी संपूर्ण भारताचा प्रवास करून देशातील सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक व आर्थिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला. मद्रासमध्ये त्यांनी तेलगू भाषेचा ज्ञानकोष पाहिला. अशा प्रकारचा ज्ञानकोश आपण आपल्या भाषेसाठी तयार करावा असे त्यांना वाटले. आणि लगेचच ते कामाला लागले. सन १९१६ मध्ये त्यांनी नागपूर येथे ज्ञानकोष मंडळाची स्थापना केली. त्यानंतर तब्बल बारा वर्षांनी  एकूण  २३ खंड असलेला "महाराष्ट्रीय ज्ञानकोश" तयार झाला.
ज्ञानकोशाव्यतिरिक्त डॉ.केतकरांनी "गोंडवनातील प्रियंवदा", "ब्राह्मणकन्या", "आशावादी","विचक्षण" "भटक्या",या कदंबर्‍यांचे लेखन केले. सन १९३१ मध्ये झालेल्या हैदराबाद येथील साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी "पुणे समाचार" हे दैनिक व "विद्यासेवक" हे मासिक काढले. दिनांक १० एप्रिल१९३७ मध्ये वयाच्या अवघ्या५३व्या वर्षीत्यांचे निधन झाले. पुण्यातील "एरवंडे" येथील "कमला नेहरू पार्क"मध्ये महाराष्ट्र् साहित्यपरिषदेच्या मदतीने त्यांची समाधी बांधण्यात आली आहे.