कथा (भाग २) 

(अंक दुसरा)
            [डॉ. साने यांचे क्लिनिक]  (अधांरात)
जोशी  : तर असं सार घडलं. अकस्मातच घडल ! मी मृत्यूला भेटलो तेही इतक्या सहजपणे.....
            माझा स्वत:चाच यावर विश्वास नाही बसत. कधी कधी वाटलं हे सारं एक स्वप्न आहे. आणि
            कोणत्याही क्षणी मी दचकून उठेन.
सरिता : हे स्वप्न आहे कि नाही हे आता या क्षणाला मी नाही सांगू शकतं पण तुमची गोष्ट मात्र
             अविश्व्सनिय आहे एवढ खरं.
जोशी  : अहो, ज्या गोष्टीवर माझा स्वतःचाच विश्वास बसत नाही. तिथे तुमचा विश्वास बसावा अशी
            अपेक्षा तरी मी कशी ठेवणार ?
सरिता : नाही. नाही. तस नाही हो. माझा तुमच्यावर विश्वास आहे. फक्त तुम्ही जे अनुभवल नां ते अद्दभूत
             होत. त्यांच काय असत, आपल्याला माहिती असलेल्य गोष्टींवर आपण चटकन विश्वास ठेवतो.
             पण एखादी नवीन गोष्ट अचानक समोर आली ना कि मग त्यावर चटकन विश्वास बसत
             नाही. उदाहरण्च द्यायच झाल तर एखाद्या बाराव्या शतकातल्या व्यक्तीला २१ व्या शतकात
             आणल तर त्यालाही इथल्या अनेक गोष्टी अद्दभूत स्वप्नवत वाटतील, गाडया, विमाने, टी.व्ही.
             अशा गोष्टींची त्याने कधी कल्पनाही केली नसेल. पण याच गोष्टींमध्ये आपल्याला काही विशेष
             वाटत नाही. त्यांचप्रमाणे तुमचा हा अनुभव.... आजच्या विज्ञानाने या गोष्टींची कधी कल्पनाही
             केली नसेल, पण भविष्यात कदाचित तुम्हाला आलेला हा मृत्यूचे रहस्य उघड करणारी
             घटना म्हणूनही ओळखला जाईल. मला एक सांगा पुढच्या सात दिवसात काय काय घडल ?
             (प्रकाश होतो)
जोशी  :  अनुभव ..... जर नरक ही कल्पना खरी असेल ना ? तर ते सात दिवस मी नरक अनुभंवला ते
             सात दिवस मी "मी" नव्हतो. मी केवळ एक शक्ती होतो. लोकांची दु:खे संपवणारी शक्ती.
सरिता : मी नीटसं समजले नाही. तो कॅफेमधून गेल्यावर काय घडले |
जोशी   : मला कसं सांगू आणि काय सांगू तेच कळत नाही. कारण जे काही घडत होतं ते माझ मलाच
              कळत नव्हतं.
सरिता : तुम्ही शांतपणे जे काही अनुभवलत तेवढेच सांगा. ते का घडलं, कशामुळे घडलं याचा
             विचारसुद्धा करु नका.
जोशी  : ठिक आहे. (उसासा सोडून) हं ! तर तो गेला आणि दुसर्‍याच क्षणी माझ्या शरिराचे....
            नाही. शरिराचे नाही. आत्म्याचे. होय आत्म्याचे असंख्य भाग झाले. एक क्षणात मी
            चराचरामध्ये विखुरला गेलो.या जगात प्रत्येक सजीवाबरोबर माझा एक अंश होता. त्या
            सजीवाला होणारी प्रत्येक वेदना मला जाणवत होती. त्याची दु:ख मला समजत होती. त्या सात
            दिवसात या जगात जेवढे म्हणून मृत्यू झाले ना ते मी अनुभवले. अगदी एका लहान पेशीपासून
            देवमाश्यासारख्या भीमकाय सजीवांच्या मृत्यूला मी कारणीभूत होतो.
सरिता : म्हणजे तुम्ही प्राण्यांचे मृत्यूही अनुभवलेत ? मला वाटलं कि फक्त माणसांचेच....
जोशी  : नाही सर्व सजीवांचेच अनुभवले. पण त्यात माणसांचे मृत्यू हे सुन्न करणारे अनुभव होते.. सर्व
            प्रकारेचे मृत्यू........ खून, अपघात, युध्द...... सर्वच प्रकार. ते आक्रोश, त्या किंकाळ्या, त्या
            वेदना, सारं काही आजही अंगावर काटा आणतात. या जगातून दु:ख दूर करणार्‍या मृत्यूला ज्या
            काही वेदना सहन करावयास लागत असतील ना त्याची जाणीव झाली. हे जग किती भयाण
            आहे ते समजल. पुरत उमगलं. ते पूर, ते भूकंप, त्यामध्ये मरणारे पशुपक्षी, माणसे, ती युध्द,
            दहशतवाद्यांकडून होणार्‍या निष्पाप जीवांची हत्या, शिकार्‍यांकडून होणार्‍या प्राण्यांच्या शिकारी,
            तोडली जाणारी झाडे, रोग-राईंमुळे मरणारी माणसे.... सारं सारं भयानक होत. ते सात दिवस
            कसे गेले ते समजलच नाही. आठव्या दिवशी जागा झालो. तो त्या हॉस्पिटलमध्ये, मल्ल
            सांगण्यात आल, कि मी सात दिवस कोमामध्ये होतो. पण खरं काय होतं ते माझ मलाच ठाऊक
             आहे.
सरिता : जोशी, तुमचा या अनुभवाबद्दल तुम्ही कोणाशी बोललात ?
जोशी   : म्हणजे हॉस्पिटलमधल्या कोणाशी ?
सरिता : होय,  हॉस्पिटलचा स्टाफ आणि इतर कोणाशीही.
जोशी  : नाही, याबद्दल मी कोणाशीही काहीही बोललो नाही. अहो, लोंक मला वेडा ठरवतील. अशी भीती
            मला वाटत होती. आज असह्य झाल. तुमच्याशीच पहिअल्यांदा मन मोकळ केलं.
सरिता : आंणि मग ते खून करायच तुम्हाला कसं सुचंल ?

जोशी   : त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये  खूप विचार केला. सात दिवस कोमामध्ये असूनही मला अशक्त
             वाटत नव्हत. मग अचानकच वाटल जे घडल ते खरच असणार. मृत्यूने दिलेला तो अनुभव खूप
             काही शिकवणारा होता. मग विचार केला जे काम सात दिवस केलं तेच पुढे चालू ठेवायच. या
             जगात खरेच खूप दु:ख आहेत. या दु:खापासून निष्पाप लोकांना मुक्त करायच असं ठरवल आणि
             दुसरं म्हणजे मृत्यूचं काम चालू ठेवल तर पुन्हा एकदा त्याची भेट होईल असा स्वार्थ ही होतो.
सरिता : अहो, पण मग लाहन मुलच का निवडलीत ?
जोशी  : त्यामध्ये खर सांगायच तर प्रॅक्टीकल कारण होतं. मी हा असा सडपातळ. मोठी माणस
            मारायची म्हणजे मोठीच जोखीम होती ही मोठी माणस जीवनाच्या खूपच आहारी गेलेली
            असतात. ती अशी सहजासहजी मरणास तयार नसतात.
सरिता : म्हणजे ? मारण्याचं काम सोप व्हाव म्हणून तुम्ही लहान मुलांनाच मारलत तर.
जोशी  : पण डॉक्टर, तुम्ही फक्त माणसांविषयी बोलता आहात मी लहान मोठे प्राणी पण मारले
            आहेत. म्हणजे कुत्रा, मांजर, उंदीर वगैरे... त्यांनाही दु:खापासून मुक्त्तता पाहिजेच ना ? काय
            बरोबर आहे नां मांझ ?
सरिता : हो हो बरोबरच आहे. पण अशा या हत्त्या करताना तुम्हाला स्वःताला आनंद होतो का ?
जोशी  : तुम्हाला आसुरी आनंद वगैरे अभिप्रेत असेल, तर तसा काहीमला होत नाही. पण कोणाला तरी
            दु:खापसून मुक्त्त केल्याच समाधान मात्र मिळतं.
सरिता : (थोडा विचार करून) जोशी, तुमच्या या अशा वागण्याला मानसशास्त्रात स्क्रिझोफ्रेनिया
             म्हणतात.
जोशी   :  पण......
सरिता : (जोशींना मध्येच थांबवून) यामध्ये रोग्याला भास होत असतो, की कोणीतरी त्याच्याशी बोलत
             आहे. हा ऐकू यणारा आवाज बार्‍याचवेळा रुग्नाला आज्ञा सोडतो. त्याचा अपमान करतो.
             बर्‍याचवेळा अशा रुग्णाला कोणत्या गोष्टी खर्‍या आणि कोणत्या खोटया हेच समजत नाही.
             आणि मग ही अनिश्चितता रुग्णाला अजून अस्वस्थ करते. जसं तुम्हाला वाटलं कि तुम्ही
             मृत्यूशी बोललात आणि नंतर त्याच्या आहारी गेलात. हा सर्व तुमच्या मनाचा भ्रम आहे.
जोशी   : तुम्ही म्हणता ते कदाचित बरोबर असेल कारण आज पहाटेच मला त्याचा आवाज ऐकू आला.
सरिता : तुम्ही मला अगोदर बोलला नाहीत.
जोशी   : I am sorry. पण मला वाटल की मला भास होत आहेत. हे तुम्हाला आधी सांगीतल तर तुम्ही माझे अनुभव ऐकूनच घेणार नाही.
सरिता : बरं ! ते काही फार महत्त्वाच नाही. पण मला एक सांगा. हा जो तुम्हाला पहाटे भास झाला
             त्यावेळी तुम्हाला काय ऐकू आले !
जोशी  :  तो आवाज त्याचाच होता. त्याचा म्हणजे मृत्यूचा, तो म्हणाला, कि आज रात्री नऊ वाजता तो
             मला भेटणार आहे.
सरिता : (आश्चर्याने) अस म्हणाला आवाज ?
जोशी   : होय. नक्की तो असच म्हणाला. पण मला वाटतं तो भासच असणार.
सरिता : (घडयाळात बघून) नऊ वाजायला थोडाच वेळ बाकी आहे. तो भास आहे कि सत्य हे थोडयाच
             वेळात समजेल. (जोशी शांत रहातात. अस्वस्थपणे होकारार्थी मान हलवितात)
सरिता : जोशी, मला खरं सांगाल ?
जोशी   : काय ?
सरिता : तुम्ही घाबरला आहात ?
जोशी   : होय मी घाबरलो आहे. पण तरीही त्याला पुन्हा भेटण्यास मी उत्सुक आहे.
सरिता : (मान हलवून) तुमची काही हरकत नसेल तर वेळ काढण्यासाठी मी तुम्हाला माझ्या एका
             पेशन्टची गोष्ट सांगू ? खरं सांगायच तर तिची कथा बहुतांशी तुमच्या सारखीच आहे.
जोशी   : माझी काहीच हरकत नाही. तेवढाच टाईमपास.
सरिता : तर ही माझी पेशन्ट....... गीता तिच नांव. तुम्ही जसं मृत्यू म्हणजे दु:ख दूर करणारा असं
             मानता तसच तिच्या मते मृत्यू म्हणजे एक शिकारी. आपल्या आनंदासाठी दुसर्‍याचे जीवन
             संपनणारा शिकारी.
जोशी   : पण मृत्यू काही असा नाही.
सरिता : जोशी, एवढे उतावळे होऊ नका आधी ऐकून तर घ्या.
जोशी   : ठिक आहे सांगा तर. पण थोडक्यातच सांगा.
सरिता : सांगते, जवळपास तीस वर्षापूर्वीची गोष्ट. मुंबई पासून काही अंतरावरील वसई नावाच्या गावात
            गीता नावाची एक मिमिक्री आर्टिस्ट होती. त्यावेळी तिच वय असेल १७, १८ वर्षाच. पण काय
            कर्यक्रम करायची म्हणून सांगू ? हळूहळू तिचे कार्यक्रम गाजू लागले. वर्तमानपत्रात फोटो, नांव
            झळकू लागले. आणि मग निरनिराळ्या गावातून तिला कार्यक्रमाची बोलावणी येऊ लागली.
            महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यात तिचे दौरे होऊ लागले. अशाच एका दौर्‍यावर गेली असताना त्या
            कार्यक्रमातील सर्व कलाकारांनी शिकारीचा बेत आखला.
जोशी   : काय शिकारीचा ?
सरिता : होय, त्या गावाजवळच जंगल होते. त्या घनदाट अशा जंगलात रात्रीच्या वेळी या लोकांनी अनेक
             लहानमोठया प्राण्यांची शिकार केली. सर्वजण आनंदात होते. खूप मजा करत होते. पण
             या गीताच्या मनात निराळेच विचार येऊ लागले. त्या मुक्या प्राण्यांच्या शिकारीपेक्षा सर्व
             पुद्धिमान अशा मनुष्य प्राण्याची शिकार करणे जास्त रोमांचकारी होईल असे तिला वाटू
             लागले. त्या एकाच विचाराने तिला घेरले.
जोशी   : काय ? मनुष्य प्राण्याची शिकार ? किती भयानक ? खूनच की तो !
सरिता : (आपल्याच तंद्रीत) दुसर्‍याच रात्री आपल्याच ग्रुपमधल्या एका माणसाची शिकार करण्याचे तिने
             ठरवले. झाडावर बांधलेल्या मचाणावरुन तिने त्याला सरळ ढकळून दिले. बिचारा ! एका
              दगडावर डोकं आपटून त्याच क्षणी तो मरण पावला.
जोशी   : काय ? छे ! तुमच्या या कथेवर माझा नाही विश्वास बसतं ! आणि पोलिसांनी किंवा इतर
             लोकांनी तिला पकडले नाही !
सरिता : नाही. सर्वांनाच तो अपघात वाटला. गीताची पहिली शिकार यशस्वी झाली. कोणालाही तिचा
             संशय आला नाही. प्राण्यांच्या शिकारीपेक्षा या शिकारीतील मजा काही औरच आहे याची तिला
             जाणीव झाली. शिकार करणे आणि ती सुध्दा इतरांना कळणार नाही अशा रितीने करणे
             आणि स्वतःला पोलिसांपासून दूर ठेवणे याच थ्रील ती अनुभवू लागली. त्यातच तिला गम्मत
             वाटू लागली. आणि मग दुसरी शिकार शोधण्याच्या विचारानेच ती शहरात आली.
जोशी   : शहरात ? शहरं म्हणजे तिला काय माणसानी भरलेली जंगल वाटली !
सरिता : होय. शहरात तिला हवी तेवढी माणसं मिळनार होती. विविध प्रकारची. विविध आंकाराची.
             लहान-मोठी माणसे, काही अति बुद्धिमान तर काही निर्बुद्ध. काही गरीब तर काही श्रीमंत काही
             लबाड तर काही भोळी-भाबडी. प्रत्येक दिवशी तिची शोधक नजर एखादं सावज मिळतय कां
             यासाठी चहूकडे भिरभिर फिरायची. आणि एके दिवशी तिला तिचे सावज मिळाले. सत्तर
             वर्ष वयाची म्हातारी गुजराथी बाई होती ती. सतत तीन दिवस गीताने तिचा पाठलाग केला. ती
             कोठे रहाते, काय करते, तिचा दिनक्रम काय, सारे तिने या तीन दिवसात जाणून घेतले. मग
             एक दिवस निश्चित केला. ती उत्कॄष्ट नकलाकार होतीच. आपल्या या कलेचा तिने पुरेपुर
             उपयोग करुन घेण्याचे ठरवले. संध्याकाळी चार ते सात या वेळेत म्हातारी एकटीच असते हे
             तिला माहित होते. पावणे पाच वाजता एक साडी विक्रेता म्हणून ती घरात घुसली. आणि साडया
             दाखवताना त्यातल्याच एका साडीने तिने त्या म्हातारीचा गळा आवळला. आणि तिला
             पंख्याला लटकावून गुपचूप घराबाहेर पडली.पोलिस दप्तरी "म्हातारीची
             आत्महत्त्या" असा शेरा मारुन फाईल बंद झाली.
जोशी   : हे..... हे सारेच भयानक आहे. माणसं इतकी भयानक होऊ शकतात  यावर माझा विश्वासच
             बसत नाही.
सरिता : जोशी, तुम्ही सुद्धा जे खून केलेत ते त्रयस्थाच्या नजरेने पाहिलेत तर त ही असेच भयानक
              वाटतात.
जोशी   : (ओशाळून) तेही खरंच आहे म्हणा !
सरिता : (हसून) पण जोशी, तुम्ही एवढयातच घाबरलात ? याहून भयानक गोष्टी अजून पुढेच
             सांगायच्याच आहेत.
जोशी   : अं ?
सरिता : एकाल नां ?
जोशी   : हो. सांगा तुम्ही.
सरिता : दोन चार वर्षात अशा तिने १५ / २० शिकारी केल्या प्रत्येक शिकार वेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या
             ठिकाणी. प्रत्येकवेळी सावजेही वेगळीच. कधी रस्त्यावर काम करणारा माथाडी, तर कधी
             बिझनेसमन, कधी बागेत खेळणारे गोंडस बालक तर कधी बसमधला सहप्रवासी. पोलिसांना
             तिचा कधीच संशय आला नाही.
जोशी   : कमाल आहे.
सरिता : कोणाची ?
जोशी   : त्या गीताची आणि पोलिसांची सुद्धा.
सरिता : जोशी पुढे ऐकताय नां ?
जोशी   : आता आणखी काय ऐकंवणार आहात डॉक्टर ?
सरिता : एक दिवस त्या गीताने पहिलं मुंडक जमवल.
जोशी   : मुंडक ? डॉक्टर, तुम्ही मुंडकच म्हणालात नां ?
सरिता : होय, मुंडकच. तुम्ही ऐकलत ते अगदी बरोबर आहे. गीता खून करत नव्हती. तर शिकार करत
             होती. माणसांची शिकार त्यामुळे इतर शिकार्‍यांप्रमाणे आपल्याही घरात आपण केलेल्या
             शिकारीच्या आठवणी असाव्यात अस तिला वाटू लागलं. इतर शिकार्‍यांप्रमाणे
             तिच्या घरातलीही एक भींत मुंडक्यानी सजवलेली आहे. पण ती मुडकी जंगली प्राण्यांची
             नसून मनुष्य प्राण्यांची आहेत.
             (जोशी घटाघट पाणी पितातं ते खूपच घाबरलेले आहेत)
सरिता : (आपल्याच तंद्रीत) तिच पहिलं मुंडकं ऐका ट्रफिक हवालदाराचं होत. एका रात्री बिच्यार्‍याने
             तिची गाडी चेक करण्यासाठी थांबवली. आणि स्वत:च डोक गमावून बसला.
जोशी   : पण याही वेळी तिला कोणी पकडू शकलं नाही ?
सरिता : मोठा गाजावाजा झाला. पण तिच्यापर्यंत कोणीही पोहचू शकल नाही. मग तब्बल तीन वर्षांनी
             दुसरं मुंडकं तिने मिळवल. ती फारच हुशार होती. आपली पद्धत पोलिसांच्या लक्षात येऊ नये
             म्हणून तिने फार प्रयत्न केले. तब्बल तीस वर्ष तिने पोलिसांना चकवल. अजूनही हे सारे खून
             एकाच व्यक्तिने केले आहेत हे पोलिसांना समजले नाही.
जोशी   : पण गुन्हा करणारा माणूस काहीतरी धागा मागे ठेवतोच.
सरिता : प्रत्येक वेळी नाही. इथे तिने केलेली प्रत्येक गोष्ट परफेक्ट झाली. कदाचीत नशिबाचीही साथ
             असेल.
जोशी   : पण तिला कधीच आपल्या कृत्याबद्दल पच्छाताप झाला नाही !
सरिता : पच्छाताप ? झाला ना. बर्‍याचवेळी झाला. मग ती मानसोपचारतज्ञांना भेटली.
जोशी   : म्हणजे तुम्हाला ........
सरिता : (मंदपणे हसून) तिने मानसोपचारतज्ञांना संपूर्ण माहिती कधीच दिली नाही. फक्त बर्‍याचवेळा
             आपल्या मनात हिंसक विचार येतात एवढेच ती सांगत असे. मग ट्रीटमेंटस चालू झाल्या.
             त्याचा थोडाफार परिणाम होऊ लागला. तिची ती शिकारीची इच्छा हळूहळू कमी होऊ लागली.
             पण कधीकधी ती दबलेली भावना हळूच डोके वर काढी आणि एखादे सावज तिचे शिकार बनत
             असे. पण ते देखील वर्षा दोन वर्षातून कधीतरीच.
             (सरिता बोलता बोलता उठून टेबलाकडे जाते) आणि आजही अशीच शिकारीची इच्छा झाली.
             (खाली वाकून एकदम उभी रहाते. हातात एका बाईचे मुंडके आहे) आणि या डॉ. सरिता
             साने माझ्या सावज बनल्या.
जोशी   : (दचकून उभे रहातात) काय ?
सरिता : (घडयाळात बघून) कदाचित तुम्हाला भेटायला येणारा मृतू माझ्या रुपातच असेल नाही कां ?
             जोशी, मी डॉ. सरिता साने नाही. मी गीता आहे गीता.
             (जोशी मागे  मागे सरकतात.)
गीता   : (सरिताच्या शिराकडे बघून) बिच्चारी ! तिला काहीच कळल नाही. गेली पंधरा वर्ष मी तिच्या
             तिच्याकडे ट्रींटमेंट घेत होते. आज मीच ती संपवली. आणि जोशी, नऊ पण वाजले नाही कां ?
             (हसते आणि घडयाळ दाखवते)
             (जोशी छातीला हात लावून मटकन खाली बसतात)
गीता   : अहो, तुम्ही इतक्या कमकुवत ह्रदयाचे असाल असे मला वाटले नव्हते. काय झाले ? खरं नाही
            वाटत ? सांगितलेली घटना अंगदी सत्य आहे. तुमच्या सारखी नाही. तुमचे फक्त भास होते.
            माझी गोष्ट बघा, अगदी पुराव्यासकट सिद्ध केली की नाही ?
जोशी   : (विव्हळत) खरच ! मी तुम्हाला ओळखू शकलो नाही.
गीता   : तुम्हीच काय ? जोशी, तुमच्या आधी एक नवीन पेशंट आली होती. तिलाही जरासुद्धा संशय
            आला नाही. मी एक उकृष्ट नकलाकार आहे हे तुम्ही विसरलात वाटंत ? अहो बाहेर बसलेली
            रिसेप्शनिष्ट आणि इन्सपेक्टर पवार हे ही माझा हा आवाज डॉ. सरिता सानेचा नाही हे ओळखू
            शकले नाहीत. (दरवाजातून एक भेदरलेला आवाज येतो) (कविता धावत आत येते)
कविता : (धापा टाकत) डॉक्टर.... डॉक्टर मला भास होताहेत. तो माणूस.....
              (गीता गोंधळून कविताकडे बघते. त्याचवेळी कविता टबलावरील डॉ. सानेंच्या मुंडक्याकडे
              बघून जोरात किंचाळते) जोशी खिशातला सुरा काढून गीताला भोसकतात. गीता खाली
              कोसळते.
जोशी   : (गीताकडे वाकून) तू..... तू (थरथरल्या आवाजात) तू मृतू असूच शकत नाहीस तू फक्त .....
              (लाथ मारतात) (नऊचे ठोके पडायला सुरुवात होते. जोशींना कविताच्या अस्तित्वाची जाणीव
              होते. कविता घाबरून थरथरत मुंडक्याकडे खाली पडलेल्या गीताकडे बघत असते.
              जोशी ताठ उभे राहून कविताकडे सरकतात कविता घाबरून हाताने थांबायची खून करते.
              तिच्या तोंडून शब्दच फुटत नाहीत. जोशी थांबतात छातीवर हात दाबून खाली कोसळतात.
              आणि प्राण सोडतात कविता आळीपाळीने तिघांकडे बघते आणि सोप्यावर सुन्नपणे बसते)
कविता : (थरथरत) याचाच अर्थ तो कॅफेमध्ये झालेला भास नव्हता. तो माणूस खरोखरच मृतू होता. होय
              तो खरच मृतू होता.