इन्टर नॅशनल लेबर ऑरगेनिझेशन्स 

कामगार आणि मालक हा भेद आता शिल्लकच राहिला नाही . एक काळ असा होता की कामगार म्हणजे गुलाम. मालक म्हणेल ते आणि म्हणेल तसच कामगारांनी वागल पाहिजे असच अपेक्षित असायच ..दारिद्र्याने गांजलेला कामगार आणि त्याच्या श्रमावर गब्बर झालेला मालक असेच चित्र बहुतांशी दिसायचे. त्यामुळे गरीब श्रीमंत दरी वाढलेली होती. राबराब राबणार्‍या मजुराला अत्यंत हीन दर्जाची वागणूक मिळत होती. कारखान्यात काम करताना त्याला मिळणार्‍या सोयीसुविधा ,तसेच त्याला मिळणारा कामाचा मोबदला फारच अपुरा होता .अर्थात अशा वातावरणात कामगारांकडून अपेक्षेप्रमाणे काम होत नसे.कामगार हाही माणूसच आहे, कंपनीला मिळणार्‍या फायद्यात त्याचा मोलाचा वाटा आहे, याची जाणीव समाजात हळूहळू होऊ
लागली.
सामाजातील बहुसंख्य लोक कामगार आहेत. त्यांच्या रहाणीमानाचा दर्जा उंचावला तर समाजही आनंदी बनू शकेल
 अशा विचारांचा फैलाव होऊ लागला. या जाणिवेतून कामगारांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यास एकत्र करण्यात येऊ लागले. यातूनच कामगार संघटनांचा जन्म झाला. काही काळाने कामगारांचे जीवनमान सुधारण्याचे प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागले. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगार संघटना स्थापण्यात आल्या. उदाहरणार्थः                                   १.  स्त्री आणि पुरुष कामगारांच्या कल्याणासाठी "इन्टार नॅशनल लेबर ऑरगॅनिझेशन" ची स्थापना करण्यात आली. सन १९४६ मध्ये जिनिव्हा येथे पहिली कामगार संघटना स्थापन करण्यात आली . स्त्री पुरुष कामगारांना स्वातंत्र्य, समता, संरक्षण, आणि सामाजिक दर्जा प्राप्त व्हावा; हेच त्याचे उद्दिष्ट होते. या संघटनेमार्फत कामगारांना विविध प्रकारच्या माहितींचे व  आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जाते. आय एल ओ किंवा इनटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन मध्ये सरकार ,कारखानदार आणि कामगार पुढारी या त्रयींचा समावेश असतो. प्रत्येक वर्षी जून महिन्यात या संघटनेची जिनिव्हा येथे बैठक होते. कामगारांचे सामाजिक आणि कामाविषयीच्या प्रश्नांसंबंधी या ठिकाणी चर्चा होऊन उपाय ठरविले जातात. सन १९६९ मध्ये 'आयएलओ' ला शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले होते.

२.   कामाचा योग्य मोबदला, कामाच्या ठिकाणचे चांगले वातावरण ,आणि इतर फायद्यांसंबंधी करार करण्यासाठी एकाच धंद्यातील कामगार एकत्र येऊन आपली संघटना स्थापन करतात.त्यांना ट्रेड युनियन असे म्हटले जाते. सर्व जगातील अशा अनेक ट्रेड युनियन्स एकत्र येऊन सन १९४९ मध्ये इनटरनॅशनल कॉनफेडरेशन ऑफ फ्री ट्रेड युनियन्स किंवा 'आयसीएफटू' ची स्थापना झाली. त्यामध्ये १५६ देशातील २४१ संघटना सहभागी झाल्या. लोकशाही पद्धतीने कारभार चालवणार्‍या  आणि कोणत्याही बाह्य दबावापासून मुक्त असलेल्या जगातील कोणत्याही ट्रेड युनियन्सना यात सहभागी होता येते. आयसीएफटूच्या तीन प्रादेशिक शाखा आहेत. आशिया आणि पॅसेफिकसाठी अ‍ॅप्रो, अफ्रिकेसाठी अ‍ॅफ्रो, आणि अमेरिकेसाठी ऑरिट अशी त्यांची नावे आहेत. कामगारांना नोकरीमध्ये स्थैर्य मिळवून देणे, कामगारांचा जागतिक दर्जा जपणे, मल्टिनॅशनल कंपन्यांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवणे,कामगार संघटनांचे हक्क जपणे , विविध कामगार संघटनांमध्ये समानता आणणे ही आयसीएफटूची उद्दिष्ट आहेत.

३.  सन १९२० मध्ये युरोपात 'वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ लेबर'म्हणजेच 'डब्ल्यूसीएल ' ही संघटना स्थापन करण्यात आली होती. ही संघटना मानवी हक्क , जागतिक कामगार दर्जात सुधारणा, स्त्रिया व मुले यांच्या हक्कांबाबत लढा देणे यासाठी कार्यरत होती.माहितीची देवाण-घेवाण, औद्योगिक प्रशिक्षण, आणि विचारपूर्वक योग्य सल्ला देण्याचे कार्यही या संघटनेने केले. पण काही आर्थिक आणि राजकीय तृटींमुळे ही संघटना सन २००६ मध्ये 'इन्टरनॅशनल ट्रेड युनियन कन्फेडरेशन 'किंवा' आयटूसी' मध्ये विलीन झाली.

अशा तर्‍हेने कामगारांचे रहाणीमान सुधारण्याच्या प्रयत्नांचे पडसाद समाजात दिसू लागले आहेत.  सुरक्षित, आनंदी, स्वतंत्र विचारसरणीने जगणारा कामगार समाजात दिसत आहे .