द. रा. कापरेकर 

१७ जानेवारी १९०५ रोजी दत्तत्रय रामचंद्र कापरेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील डहाणू या गावी झाला. पेशाने ते शिक्षक होते.  नाशिक येथे त्यांनी नोकरी केली. त्यांना गणिताचा छंद  होता.  याच छंदामुळे त्यांचे नांव जगभर गाजले. कोणतीही चार अंकी संख्या घेतली व त्यातील  अंक चढत्या आणि उतरत्या क्रमाने मांडून त्यांची वजाबाकी केल्यास उत्तर ६१७४ असेच येते हे कपरेकरांनी दाखवून दिले. उदाहरणार्थ ७६४१ ही संख्या उलट्या क्रमानो लिहिल्यास १४६७ अशी येईल आणि ७६४१ व १४६७ यांची वजाबाकी ६१७४ अशी येते .मार्टिन गार्ट्न नावाच्या लेखकाने 'अमेरिकन मॅथेमॅटिकल ग्रंथाली' मध्ये याची नोंद घेतली. आणि कापरेकरांनी शोधलेली ६१७४ ही  संख्या " कापरेकर स्थिरांक " म्हणून मान्य पावली. स्वतःच्या "दत्तात्रय" नावाच्या संख्येचा शोधही त्यांनी लावला. दत्तात्रयात ब्रम्हा, विष्णू, महेश अशा तीन देवता आहेत :तसेच तीन वर्गदर्शन देणार्‍या संख्याही गणितात आहेत; हे कापरेकरांनी शोधून काढले. उदाहरणार्थ ४९ या संखेत २ चा वर्ग ४ आणि ३ चा वर्ग ९ तसेच ७चा वर्ग ४९ अंतर्भूत आहे.

कॅल्युलेटर आणि  कंप्युटरचा प्रसारही झाला नव्हता त्या काळात कापरेकर मोठमोठ्या आकड्यांच्या गणिती क्रिया पटापट करत. अनेक संख्यांचे गुणधर्म त्यांनी शोधून काढले. "स्वयंभू संख्या", "डेल्मो संख्या","हर्षद संख्या', "विजय संख्या" अशी अर्थपूर्ण नांवेही त्यांनी या संख्यांना दिली. त्यांचे गणित विषयावरील लेख जगभरातल्या अनेक मासिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. मराठा विद्यापीठाच्या बी. एस. सी. मॅथेमॅटिक्ससाठी 'नंबर थिअरी' या विषयाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या संशोधनाचा समावेश आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या'अभिनव भारत' मधील एका खोलीत ते रहात होते. त्याला "गणितानंद मंडळ" असे नांव त्यांनी दिले होते. तेथेच त्यांनी गणिताच्या अनेक संकल्पनांचा शोध घेतला. सन १९८६ मध्ये त्यांचे निधन झाले.