कमला सोहनी 

थोर साहित्यिक दुर्गाबाई भागवत  यांच्या भगिनी कमला जोशी यांचा जन्म पंढरपूर येथे १८ जून १९११ रोजी झाला. भागवत घराणे हे परंपरावादी व साहित्याचे अभ्यासक होते. पण कमलाबाईंनी मात्र विज्ञानाचा वसा घेतला होता. लहानपणापासूनच त्या चौकस बुद्धिच्या होत्या. विज्ञानाबद्दल त्यांच्या मनात प्रेम व आत्यंतिक आवड होती. म्हणूनच बी. एस.सी ची पदवी घेऊन न थांबता त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम. एस. सी. ची पदवीही त्यांनी संपादन केली. ही पदवी धारण करणार्‍या त्या पहिल्या महिला होत्या. याच कालखंडात त्यांना विज्ञान संशोधन शिष्यवृत्ती तसेच "स्पिंगर रिसर्च स्कॉलरशिपही मिळाली. आणि त्या केंब्रिजला "इंडियन इंन्स्टिट्युट ऑफ सायन्स" या संस्थेत शिकण्यासाठी रवाना झाल्या.अवघ्या चौदा महिन्यात त्यांनी संशोधन पूर्ण करून डॉक्टरेट मिळवण्याचा विक्रम केला. वनस्पतीपेशींमध्ये "सायकोटोस सी" असल्याचा शोध त्यांनी लावला होता. आपल्या संशोधनासाठी त्यांनी दूध, कडधान्य, नीरा असे नित्योपयोगी पदार्थ वापरले होते.

४ सप्टेंबर १९४७ रोजी कमलाबाईंचा माधवराव सोहनी यांच्याशी विवाह झाला. सन १९३४ पासून सन १९६९ पर्यंत त्यांनी संशोधनाचे कार्य केले. त्यांनी सहाशेहून अधिक प्रबंध लिहिले. ते आपल्या देशातील आणि परदेशातील नियतकालिकात प्रसिद्ध झाले. त्यांच्या कडधान्यावरील संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त "इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च" या संस्थेने आयोजित केलेल्या सन्मान समारंभाला गेल्या असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले.त्यांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले गेले. पण याच आजारात दिनांक ८ सप्टेंबर १९९७ रोजी त्यांचे निधन झाले.