काकवी 

               उसापासून गूळ आणि साखर तयार करण्याच्या प्रक्रियेत काकवी तयार होते. यालाच "पातळ गूळ" असे म्हणतात. काकवी दिसायला मधासारखी घट्ट व चिकट असते. चवीला गोड आणि भरपूर पौष्टिक मूल्य असलेली काकवी फार पूर्वी युरोपमध्ये औषध म्हणून वापरली जात असे. सोळाव्या शतकात तिचा वापर पाककृतींमध्ये होऊ लागला. काकवीमध्ये ७% कर्बोदक, ८५% साखर, ४% सोडियम व कॅल्शियम, आणि लोह ६% असते.
          साधारणतः दसर्‍यानंतर उस तोडणी सुरू होते. उसाचे दांडे जमिनीलगत कापले जातात. त्याची पाने काढून टाकली जातात. नंतर ते चांगले धुवून चौवीस तासाच्या आत त्याचा रस काढला जातो. हा रस नायलॉनच्या गाळणीने गाळला जातो. आणि मोठ्या टाक्यांतून साठवला जातो. मग सहा तासाच्या आत तो उकळायला ठेवला जातो. उकळताना त्यात चुन्याची निवळी मिसळली जाते. त्यामुळे त्यातील प्रथिनांचा गाळ घट्ट होऊन वर जमू लागतो. सामान्यतः ८५ अंश सेंटीग्रेटला हा गाळ वरती तरंगू लागतो. हा तरंगत असलेला गाळ स्टेनलेस स्टीलच्या झार्‍याने बाजुला काढला जातो. दाट आणि गडद तपकीरी  रंगाच्या या गाळाला " धूरमळी" असे म्हटले जाते. यानंतर या रसात फॉस्फरीक अ‍ॅसिड मिसळले जाते. त्यामुळे त्यातील अल्कलीचे उदासीकरण होते. मग त्यात योग्य प्रमाणात भेंडीची रोप मिसळतात. यालाच "व्हेजिटेबल क्लॅरिफिकन्ट" असे म्हणतात. ही क्रिया २-३ वेळा करतात. यावेळी रसावर पिवळसर रंगाची मळी तयार होते. तिला "सोनमळी" असे म्हणतात. सोनमळी काढल्यानंतर रस पारदर्शक पिवळट तपकिरी रंगाचा दिसतो. आता हा रस उकळत असताना खूप फेस जमा होऊ लागतो. त्यामुळे तो सतत ढवळावा लागतो. सुमारे १०४ अंश ते १०६ अंश तापमानाला रस घट्टसर होतो. यालाच "पातळ गूळ" किंवा "काकवी असे म्हणतात.
           कोणत्याही प्रकारचा हलवा, खिरी, लाडू, वड्या बनवताना काकवीचा वापर केल्यास पदार्थाला एक छान स्वाद येतो. फळांची गोडी लोणची, चिक्की, गोड भात यामध्ये काकवीचा वापर करतात. बिस्किटांना रंग व स्वाद आनण्यास काकवीचा वापर करतात. कॉफी व चॉकलेट केकमध्येही काकवीचा वापर केला जातो. पावाला किंवा पोळीला जामप्रमाणे लावून त्यांची चव वाढवण्यास काकवी उपयुक्त ठरते.
         काकवी साठवून ठेवताना मात्र खास काळजी घ्यावी लागते. काकवीची बाटली न उघडता तशीच ठेवली तर ती दोन वर्षसुद्धा टिकते. बाटली उअघडल्यावर मात्र ती स्वच्छ पुसून फ्रिजमध्ये ठवणे आवश्यक असते. नाहीतर त्यात लगेच जंतुंची वाढ होऊ लागते. न उघडलेली काकवीची बाटली तशीच ठेवली तरी त्यात साखरेचे स्फटिक जमू लागतात. पण डबल बॉयलरमध्ये ठेऊन ती पुन्हा द्रवरूप करता येते.


Kakvi

Jaggery is used as an ingredient in both sweet and savory dishes across India. For example, a pinch of it is sometimes added to sambar, curry, and other staples in India.
Jaggery is also added to Dal to add sweetness to balance the spicy, salty and sour components, particularly in Bengali cuisine and Gujarati cuisine. The Indian state of Maharashtra is the largest producer and consumer of Gul .
In Maharashtra, most vegetables curries and dals contain it. This is specially used during Makar Sankranti for making a dessert called tilgul. In Gujarat, known as Gul during Makara Sankranti, a similar preparation called Tal na Ladu or Tal Sankli is made. In rural Maharashtra, water and a piece of jaggery is given when someone arrives home from working under a hot sun. Kakvi, a byproduct of the production of jaggery, is also used in rural Maharashtra as a sweetener. It contains many minerals not found in ordinary sugar and is considered beneficial to health by the traditional Ayurvedic medical system. It is an ingredient of many sweet delicacies such as gur ka chawal a traditional Rajasthani dish. Refer - http://en.wikipedia.org/wiki/Jaggery for more details