डाळिंब 

लालचुटुक दाण्यांनी भरलेल, रंगरूप आणि गुणांनी परिपूर्ण अस रसदार फळ म्हणजे डाळिंब. जगात ज्ञात असलेल्या सर्वात जुन्या फळापैकी हे एक फळ आहे. म्हणूनच पुराणांमधून, धार्मिक विधींमधून औषधोपचारातून याचे नाव ऐकायला मिळते. "दाडिम", "अनार", "प्युनिक अ‍ॅपल", "पाम गारनेटी", "ग्रनाडा" अशा अनेक नावांनी जगाच्या विविध भागात ओळखल्या जाणार्‍या या डाळिंबाचे वनस्पतीशास्त्रीय नाव "प्युनिकम ग्रॅनाटुम" असे आहे. मूळच 'पर्शियन" असलेल हे फळ  पूर्वी इराण, बलुचिस्तान मधील जंगलात मिळत असे. इसवीसनापूर्वी १२५ वर्षे "शँग क्वीआन" या चिनी प्रवाशाने ते चीन मध्ये आणले. हिमालयात त्याची लागवड करण्यात आली. तेथून मग ते इटली, स्पेन, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका आदि देशात पोहोचले.
स्पेनने  डाळींबाला आपले रष्ट्रीय फळ म्हणून आपलेसे केले आहे. पुनरुत्पत्तीच प्रतिक असलेल्या या फळाला चिनी संस्कृतीतही मानाचे स्थान आहे. आपल्या तुळशीप्रमाणे चिनमध्ये प्रत्येक घरी डाळींबाचे झाड असते. त्यामुळे विघ्न घरापासून दूर पळतात अशी त्यांची समजूत आहे. विपुलता,सुपिकता आणि पुनरुत्पत्ती या गुणांशी जोडल गेलेल्या या डाळिंबाचे पाकात घातलेले दाणॅ लग्नसमारंभात पाहुण्यांना दिले जायचे. शिवाय वधुवराच्या मिलनाच्या वेळी त्यांच्या शय्येभोवती ते पसरले जायचे. तसेच पिकलेल्या डाळिंबाचे चित्र लग्नभेट म्हणून दिली जायची. डाळिंबातील शेकडो बियांमुळे ग्रीकमध्येही डाळिंब पुनरुत्पत्ती, विपुलता, वृद्धीचे प्रतिक मानले जाते. ख्रिश्चन धर्मातही मदर मेरीच्या हातात डाळिंब दाखवलेले असते. इजिप्त पिरॅमिडसमध्येही मम्मीबरोबर डाळींब हे फळ ठेवलेले आढळले आहे. जपानमध्ये 'किशिमोजिन" या अपत्यप्राप्ती देणार्‍या देवतेच्या चित्रात एका हातात बाळ आणि दुसर्‍या हातात डाळींब दाखवलेले असते. बौद्ध धर्मातही तीन अमृत फळात संत्रे, पीच याबरोबर डाळींबाला स्थान दिलेले आहे.
डाळिंबामध्ये व्हिटॅमिन "सी", आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्याने विविध औषधोपचारात डाळिंबाचा उपयोग केला जातो. डाळिंब पाचक असल्याने डाळिंबाचा पोटाच्या विकारावर मुबलक प्रमाणात उपयोग केला जातो. अतिसार, कॉलरा, पित्तप्रकोप, हृदयरोग, अजीर्ण, काविळ, खोकला यासारख्या आजारावर डाळिंब औषध म्हणून उपयोगी आहे. अंगावर येणारे पुरळ, बिघडलेला आवाज, तोंडाची चव जाणे, ज्वर, इत्यादीसाठीही डळिंबाचा औषध म्हणून उपयोग केला जातो. रक्तशुद्धी आणि रक्त वृद्धीसाठीही डाळिंब गुणकारी आहे.
डाळिंबाच्या रसापासुन कॉकटेल्समध्ये वापरले जाणारे "ग्रॅनडाईन सिरप" बनवले जाते. पदार्थाला आंबटपणा आणण्यासाठी डाळिंबाचा वापर होतो. डाळिंबाच्या सालांपासून शाई तयार केली जाते. "व्हिजिटेबल डाय म्हणूनही त्याचा वापर होतो. मॉकटेल्स, जॅम,पुडिंग, जेली, सोसेस,केक्स यातही डाळिंब वापरले जाते. पदार्थ सजावटीसाठीही डाळिंबाच्या लालचुटुक दाण्यांचा वापर होतो. डाळिंबाच आणखी वैशिष्ट्य म्हणजे ते पिकल्यावर महिनाभरसुद्धा उत्तम स्थितीत राहू शकते.


Pomegranates

The pomegranate (Punica granatum) is a fruit-bearing deciduous shrub or small tree growing between five and eight meters tall.
Pomegranates are listed as high-fiber in some charts of nutritional value. That fiber, however, is entirely contained in the edible seeds which also supply unsaturated oils. People who choose to discard the seeds forfeit nutritional benefits conveyed by the seed fiber, oils and micronutrients.
Pomegranate aril juice provides about 16% of an adult's daily vitamin C requirement per 100 ml serving, and is a good source of vitamin B5 (pantothenic acid), potassium and polyphenols, such as tannins and flavonoids.
The pomegranate in Sanskrit is called as Beejpur (literally: replete with seeds) symbolizes prosperity and fertility, and is associated with both Bhoomidevi (the earth goddess) and Lord Ganesha (who is also called Bijapuraphalasakta, or the one fond of the many-seeded fruit). Every part of the plant (root, bark, flowers, fruit, leaves) is used for medicinal purposes in Ayurveda
Refer - http://en.wikipedia.org/wiki/Pomegranate for more details