खुदीराम बोस 

३डिसेंबर सन १८८९ रोजी पश्चिम बंगालमधील मेदनीपूर येथे खुदीरामचा जन्म झाला. केवळ दहा वर्षाचेअसतानाच त्याम्चे आई-वडील निवर्तले. खुदीरामच्या मेव्हण्यांनी त्यांचा साम्भाळ केला.स्वातंत्र्यप्रेमाने भारित झालेल्या या तरुणाने केवळ नववी पर्यंत शिक्षण पूर्ण होताच स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होण्याचा निश्चय केला. आखाड्यात जाऊन लाठी, तलवार, कट्यार चालवण्याचे शिक्षण त्यांनी घेतले. आणि ते "रेव्होल्युशनरी पार्टी"चा सदस्य बनले. सन १९०५च्या वंगभंग चळवळीत भाग घेतलेल्या खुदीरामला २८ फेब्रुवारी सन १९०६ मध्ये इंग्रजानी अटक केली. परंतु तो त्या कैदेतून पळून गेला. अर्थात दोनच महिन्यानंतर इंग्रजानी त्याला पुन्हा अटक केली. आणि लगेचच १६मे सन १९०६ मध्ये त्याला मुक्त केले. खुदीरामचे स्वातंत्र्यचळवळीतील कार्य पुन्हा चालू झाले. ६ डिसेंबर सन १९०७ मध्ये खुदीरामने नारायणगढ रेल्वेस्थानकात त्यावेळच्या गव्हर्नरच्या ट्रेनवर हल्ला चढवला. पण नशिबाने या अपघातात गव्हर्नर त्यातून बचावले. त्यानंतर खुदीरामने सन १९०८ मध्ये वॉटसन आणि पॅम्फाईल्ट या अधिकार्‍यांवरही हल्ला चढवला. पण याहीवेळी हे दोनही अधिकारी बचावले. याचवेळी मुजफ्फरच्या किंग्जफोर्ड नामक जज्जने क्रांतिकारकांना कडक शिक्षा केली होती. या घटनेचा बदला घेण्याचे खुदीरामने ठरवले. प्रफुल्लचंद्र चाकी नावाच्या आपल्या मित्राच्या मदतीने खुदीरामने ३० एप्रिल सन १९०८ रोजी किंग्जफोर्डच्या गाडीवर बाँब फेकला. पण दुर्दैवाने किंग्जफोर्ड त्या दिवशी त्या गाडीतून प्रवास करत नव्हते. त्यामुळे त्या गाडीत बसलेल्या दोन युरोपीयन महिला मात्र नाहकच त्या बोंब हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या. या गुन्ह्याच्या संदर्भात वाइनी स्टेशनवर पोलीसांनी या दोघांना पकडले. प्रफुल्लचंद्र चाकीने आता सुटका नाही म्हणून स्वतःवरच गोळ्या घालून मृत्युला जवळ केले. आणि पोलिसांनी खुदीरामला अटक केली. गुन्ह्याची शिक्षा म्हणून खुदीरामला ११ ओगस्ट सन १९०८ रोजी मुजफ्फर जेलमध्ये फाशी देण्यात आले. भारतीय क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्यलढ्यात बाँबचा प्रथमच यशस्वी प्रयोग करुन स्वातंत्र्यलढ्यात  बाँबयुग सुरू करण्याचे श्रेय हुतात्मा खुदीरामलाच द्यावे लागेल.


Khudiram Bose

Khudiram Bose was one of the youngest revolutionaries early in the Indian independence movement. Khudiram Bose was born on 3 December 1889 in the village Habibpur near the town of Midnapur in the Midnapore district of West Bengal.
Bose was inspired by his teacher Satyendranath Bose and readings of the Bhagavad Gita, which helped him embrace revolutionary activities aimed at ending the British Raj. He was especially disillusioned with the British following the partition of Bengal in 1905. He joined Jugantar - a party of revolutionary activists.
At the young age of sixteen, Bose planted bombs near police stations and targeted government officials. He was arrested three years later on charges of conducting a series of bomb attacks. The specific bombing for which he was sentenced to death resulted in the deaths of 3 persons.
At the time of his hanging, he was 18 years, 7 months 11 days old—barely a legal adult.
Khudiram has been remembered for his attempt and martyrdom for reasons more than the attempt itself. His revolutionary attempt marked the beginning of the intense period of armed revolution against the British Raj which came to be known as the "fiery age". DHe became the first of the revolutionaries of the said period to be martyred by being hanged.
more reference http://en.wikipedia.org/wiki/Khudiram_Bose