निरोगी जीवनासाठी फलाहार 

१.] द्राक्ष :- हिरवी, काळी, आणि जांभळट अशा रंगात द्राक्ष आढळत असली तरी त्यांच्यातील आहारमूल्य मात्र सारखेच असते. द्राक्षामध्ये जवळजवळ पंचाहत्तर टक्के पाणी असते. तसेच मँगनीज, कॅल्शियम, पोटॅशियम ही आहारमूल्य असतात. द्राक्षामध्ये हिमोग्लोबिनच प्रमाण वाढवणार आणि हाडांमध्ये कोलॉजिन फायबरची निर्मिती करण्यास मदत करणार "सी" व्हिटॅमिन असत. पेशींमध्ये उर्जा निर्माण करणार "बी" व्हिटॅमिन, सूर्याच्या अतिनील किरणांपासून रक्षण करणार आणि हवेतील फ्री रॅडिकल्सपासून त्वचेच रक्षण करणार" ई" व्हिटॅमिन असत. द्राक्षांच्या सालीमध्ये असणार्‍या अँटिऑक्सिडंटमुळे कॅन्सर सारख्या रोगापासून बचाव करता येतो. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचा थर साचू न देण, रक्तामधील साखरेच प्रमाण नियंत्रित ठेवण, हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियमच प्रमाण वाधवण, मेंदूच कार्य सुरळीत ठ्वण यासाठी आहारात द्राक्षाचा समावेश आवश्यक आहे.
२.] लिंबू :- पदार्थाला वेगळा स्वाद आणणार्‍या लिंबामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मँगनीज, जीवनसत्व "क",, "ब", सायट्रिक अ‍ॅसिड, रेषायुक्त घटक, आढळतात. लिंबातील अँटिबॅक्टेरियल आणि अँटिसेप्टिक गुणधर्म केस आणि त्वचेचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात. लिंबातील सायट्रिक अ‍ॅसिडमुळे लिंबाला आंबटपणा असतो. तोंडाला चव आणण्यास, पदार्थाचे पचन होण्यास, पदार्थ टिकवून ठेवण्यास म्हणूनच लिंबाचा वापर केला जातो. पोटदुखी, पित्तविकार, अपचन, बद्धकोष्टता, इत्यादि विकरांवर लिंबू गुणकारी आहे. रक्त शुद्ध करण्यासही लिंबू काही प्रमाणात मदत करते. मूतखड्याचे आजार, दात हिरड्यांचे आजार, बरे करण्यास लिंबाची मदत होते. शरीराचे तापमान कायम राखण्यास लिंबूपाणी अवश्य प्यावे. लिंबू डाययुरेटिक असल्याने शरिरातिल अयोग्य घटक बाहेर टा़अण्यास आणि भरपूर मूत्र होण्यास त्याचा उपयोग होतो.
३.] आवळा :- "सी" व्हिटॅमिनने पुरेपूर भरलेले आंबट-तुरट चवीचे हे फळ बहुगुणी आणि बहूपयोगी आहे. शक्तिवर्धक रसायनांचा आवळ्यामध्ये समावेश असल्याने ते एक औषधी फळ म्हणून ओळखले जाते. पित्त, कफ आणि जुलाब या आजारांवर ते उपयोगीअसल्याने त्याला त्रिदोषनाशक म्हटले जाते. पचनशक्ती वाढवण्यास, वार्धक्य दूर ठेवण्यास, चेहरा तेजस्वी राखण्यास, कांती सतेज राखण्यास,केसांच सौंदर्य वाढवण्यास, दृष्टी सुधारण्यास आणि दात मजबूत राखण्यास आवळ्याचे सेवन अवश्य करावे. आवळा रक्तशोधक, ज्वरनाशक, वीर्यवर्धक,आणि पाचक आहे. हृदयरोग, मधुमेह, स्वप्नदोष, श्वेतप्रदर, सर्दी- खोकला  इत्यादि आजारांवर गुणकारी आहे. आवळा खाल्याने स्मरणशक्ती व बुद्धी वाढते. आबालवृद्धांनी वर्षभर लोणची, मुरांबा, सुपारी, सरबत आदी स्वरुपात आहारात आवळ्याचा वापर करणे हिताचे आहे.
 ४.] डाळिंब :- डाळिंब त्रिदोषनाशक, मेधावर्धक, बलप्रद, शुक्रवर्धक आहे. डाळिंबामध्ये लोह, "सी" जीवनसत्व, सोडियम आणि टॅनिक अ‍ॅसिड मोठ्या प्रमाणावर असते. त्यमुळे रक्त शुद्ध बनते. अतिसार, पोटातील जंत, यावर डाळिंब उपयुक्त आहे. रक्तदाब, संधीवात, मुळव्याध, या विकारावर डाळिंब गुणकारी आहे. यकृत व आतड्याची कार्यक्षमता डाळिंब सेवनाने निश्चितच वाढते.
 ५.] अननस ;- अननसामध्ये फॉस्फरिक अ‍ॅसिड, लोह, मॅग्नेशियम, सोडियम, कार्बोहायड्रेटस, कॅल्शियम, क्लोरिन, तांबे, तसेच जीवनसत्व 'ए", "बी", "सी", असते. याशिवाय अननसात ''ब्रोमोलिन" नावाचे पेप्सिनसारखे द्रव्य असते. त्यामुळे अपचन व अजीर्ण सुधारते.बद्धकोष्टता नष्ट होते. स्वादिष्ट व थंड असा अननस अंतःस्त्रावक ग्रंथींना पोषक आहे. अजीर्ण, कफ, दमा, ब्राँकायटिस, घटसर्प, घशाचे विकार, उच्च रक्तदाब, मेदवृद्धी, स्त्रियांच्या मासिक पाळीतील अनियमितपणा यासारख्या विकारात अननस उपयुक्त आहे.
६.] संत्र :- भरपूर प्रमाणात सी जीवनसत्वाने युक्त असे हे फळ औषधी आहे. सर्दी, दमा, खोकला, पायोरिया, मूळव्याध, बद्धकोष्टता, त्वचाविकार, स्थूलता, अजीर्ण, टायफाईड, इन्फ्युअँझा, स्कर्वी, कुपोषण इत्यादी अनेक आजारात संत्री गुणकारी ठरतात. रक्त शुद्ध करण्यास, पचनशक्ती वाढवण्यास, संत्री अत्यंत गुणकारी आहेत. दंतविकार व मानसिक आजारातही संत्री उपयुक्त ठरतात.
 ७.] सफरचंद :- सफरचंदामध्ये जीवनसत्व "ब१", "बी२", "बी६", व "स " असते. सफरचंदातिल पेक्टीन नावाचे द्रव्य आतड्यांना मजबूत करते. सी जीवनसत्व आतड्यातील अनावश्यक जंतुंचा नाश करते. त्यामुळे भूक छान लागते. बद्धकोष्टता दूर होते. उच्च रक्तदाब, हृदयविकार, काविळ, इत्यादी आजारांवर सफरचंद उपयुक्त आहे. यकृत व मूत्रपिंडाची दुर्बलता कमी करण्यास, पोटातील वायू नष्ट करण्यास सफरचंद मदत करते.
 ८. ] पपई :- पिकलेल्या पपईमध्ये जीवनसत्व "ए", "सी'', थायमिन, रिबोफ्लेविन, प्रथिने, क्षार, पिष्टमय पदार्थ, लोह,  याबरोबरच सायट्रिक अ‍ॅसिड, टार्टारिक अ‍ॅसिड, मॅलिक अ‍ॅसिड, पेपेन ही उपयोगी द्रव्ये असतात. पपई  एक उत्तम रेचक, कफनाशक, भूक वाढविणारे, पाचक असे फळ आहे. बद्धकोष्टता, अजीर्ण, अतिसार, आंत्रदाह, कॅन्सर इत्यादिवरपपई गुणकारी आहे. नियमित पपई खाण्याने यकृत व प्लिहा यांचे विकार होत नाहीत. आणि पचनक्रिया सुधारते.
 ९.] फणस :- काटेरी आवरणात दडलेले फणसाचे गोड गरेही काही आजारात औषध म्हणून उपयोगी असतात. त्यामध्ये जीवनसत्व "क" आणि "अ" तसेच पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. फणसाचे तंतुमय गरे खाल्ल्याने बद्धकोष्टतेचा त्रास तसेच पचनसंस्थेचे अन्य विकार होत नाहीत. त्वचा व दृष्टी निरोगी राखण्यास फणसाची मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, शरिरातील पांढर्‍या पेशींचे कार्य वाढवण्यास फणस उपयुक्त आहे. रक्तदाब, हृदयविकार या आजारातून मुक्तता मिळवण्यास फणस काही प्रमाणात मदत करतो.
 १०.] शहाळ :- सर्वोत्तम नैसर्गिक शीतपेय म्हणून शहाळ्याच नाव घ्याव लागेल. कारण ते जंतूविरहित असते. त्यात पोटॅशियम व क्लोरिन हे घटक नैसर्गिक स्वरुपातच असतात. याशिवाय त्यात कार्बोहायड्रेटस, प्रथिने, स्निग्धपदार्थ, कॅल्शियम, फॉस्फरस, "सी"जीवनसत्व, आणि उष्मांक असतात. ते पचनास सहज सोपे असून शरिरातील विजातीय घटकांना शरिराबाहेर काढण्यास उपयुक्त असते. चेहर्‍याचे तारुण्य टिकवण्यासही शहाळ्याचे पाणी घेतले जाते. यकृत विकार, मूत्रपिंडविकार हृदयविकार यात शहाळे उपयुक्त आहे. रक्तशुद्ध करण्यास, शरिराचा अशक्तपणा घालवण्यास शहाळे मदत करते.


Fruits

Fruits are generally high in fiber, water, vitamin C and sugars, although this latter varies widely from traces as in lime, to 61% of the fresh weight of the date.[31] Fruits also contain various phytochemicals that do not yet have an RDA/RDI listing under most nutritional factsheets, and which research indicates are required for proper long-term cellular health and disease prevention. Regular consumption of fruit is associated with reduced risks of cancer, cardiovascular disease (especially coronary heart disease), stroke, Alzheimer disease, cataracts, and some of the functional declines associated with aging.
Diets that include a sufficient amount of potassium from fruits and vegetables also help reduce the chance of developing kidney stones and may help reduce the effects of bone-loss. Fruits are also low in calories which would help lower one's calorie intake as part of a weight-loss diet.
Fruitarianism involves the practice of following a diet that includes fruits, nuts and seeds, without animal products, vegetables and grains.[1] Fruitarianism is a subset of dietary veganism.
Fruitarianism may be adopted for different reasons, including: ethical, health, religious, political, environmental, cultural, aesthetic and economic. There are many varieties of the diet. Some people whose diet consists of 75% or more fruit consider themselves fruitarians.