मधुमेह 

अनेक आजारांना निमंत्रण देणारा आजार म्हणून मधुमेहाकडे पाहिले जाते. आजकाल लहान मुलांमध्येही आढळून येणार्‍या या आजाराकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे झाले आहे.भारतात पस्तीस लाखाहून अधिक लोक या आजाराला बळी पडलेले आहेत.मधुमेहाबाबत जनतेत जागृती व्हावी यासाठी १४ नोव्हेंबर हा दिवस मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो.
                 रक्तातील साखरेची पातळी कमी जास्त झाली की मधुमेह होतो. कामाचा त्रास , मानसिक त्रास, अयोग्य आहार या कारणांनी मधुमेह होतो. हातापायाला मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे, अंगाला खाज येणे,नजर कमी झाल्यासारखे वाटणे, सतत लघवी होणे, तहान भूक वाढणे, वजन कमी होणे, मळमळणे, ही मधुमेहाची काही लक्षणे आहेत. मधुमेह तीन प्रकारचा असतो. रक्तातील अतिरिक्त साखरेशी संबंधित असा हा आजार आहे. मनुष्याच्या स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करण्यास शरीर जेंव्हा असमर्थ होते, तेंव्हा पहिल्या प्रकारचा इन्सुलिनवर अवलंबित असलेला मधुमेह होतो. बर्‍याचदा  बालकांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आढळते. .इन्सुलिन या संप्रेरकामुळे अन्नातील पोषक द्रव्य व शर्करा शरिरात शोषले जाणे, प्रथिनांची निर्मिती होणे, मेद साठविला जाणे शक्य होते. मात्र  इन्सुलिनच्या अभावामुळे रक्त शर्करेची पातळी उंचावते आणि मधुमेह होतो.  काही वेळा स्वादुपिंडातील बिटा पेशींमध्ये साखर शिरण्यासाठी उपयुक्त असलेले संप्रेरक इन्सुलिन निर्माणच होत नाही किंवा कमी प्रमाणात निर्माण होते. अशावेळी शरिरातील बचावात्मक यंत्रणेवर शरिरातीलच काही पेशी हल्ला चढवतात. शरिराकडून स्वतःच्याच पेशीजलाविरुद्ध प्रतिद्रव्याची निर्मिती करणार्‍या या आजाराला ऑटोइम्यून प्रकारचा आजार असे म्हणतात. हा मधुमेहाचा दुसरा प्रकार. जेंव्हा रक्तशर्करेची पातळी उंचावते तेंव्हा स्वादुपिंड इन्सुलिन तयार करू लागते. त्यामुळे मग स्वादुपिंडातील इन्सुलिन बनविणार्‍या पेशींचा नाश होतो. अशावेळी पुरेशा प्रमाणात इन्सुलिन बनविण्याच्या क्षमतेच्या अभावी शरीर रक्तशर्करेचे चयापचय करू शकत नाही. आणि  केटॉअ‍ॅसिडसारखे विषारी आम्ल मात्र तयार होते. हा मधुमेहाचा तीसरा प्रकार झाला.हा मधुमेह अनुवंशिकही असू शकतो.
            मधुमेह  टाळता येत नसला तरी त्यावर नियंत्रण ठेवणे रोग्याला शक्य झाले तर दिर्घायुष्यही तो जगू शकतो. सकस आहार, नियमित व्यायाम, नियमित इन्सुलिन घेणे, रक्तशर्करेची पातळी दिवसातून अनेक वेळा मोजणे अशी बंधने स्वतःच स्वतःवर घालून घेतली तर ते सहज शक्य होते. ग्लुकोमीटर नावाचे यंत्र रक्तातील साखरेची पातळी तपासण्यास उपयुक्त ठरते. कारण इसुलिनचे प्रमाण अधिक असताना व्यायाम केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊन हायपोग्लायसेमिया नावाचा आजार होण्याची शक्यता असते.
                   काही औषधी वनस्पतीही मधुमेहापासून आराम देण्यास उपयुक्त असतात. कडवट चवीची पांढर्‍या सदाफुलीची ५,७,किंवा ९ पाने सकाळी उठल्यावर तोंड न धुता रिकाम्या पोटी खाल्यास साखरेचे प्रमाण कमी होत. आंबट चवीची इन्सुलिन प्लान्टची पान सकाळी खाल्ल्यास ती शरिरातील इन्सुलिन वाढवण्याच काम करतात. गुडमार किंवा मधुनाशिनी वनस्पतीची पान, काड्या, तसेच मुळ मधुमेहाच्या आजारात औषध म्हणून उपयोगी आहेत. जांभळाचीसुद्धा पान, फळ, बिया, साल असे सर्वच घटक मधुमेहावर गुणकारी आहेत. सकाळी उठल्यावर पेरुची कच्ची पाने चावून खाल्ल्यास शुगर नियंत्रित रहाते. याशिवाय तुळस, कडुलिंब मेथी यांचा उपयोगही मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो.
              काही पथ्य पाळल्यानेही मधुमेहावर विजय मिळवता येतो. १.]नेहमी प्रेशी झोप घ्यावी. २.] मानसिक त्रास करून घेऊ नये. ३.] नियमित पोट साफ होईल याकडे लक्ष ठेवाव. ४.] भरपूर पाणी प्याव. ५.] गॉड पदार्थ वर्ज करावेत. ६.] अति मसालेदार,तेलकट, तिखट, मांसाहारी पदार्थ खाण टाळाव.७.] मद्य, गुटखा, तंबाखू यासारख्या मादक पदार्थांच सेवन टाळाव. ८] आहारात काकडी, मुळा, गाजर यांच प्रमाण वाढवाव. ९.] कापसाच्या गादीवर झोपणे, डोक्याखाली उशी घेणे या गोष्टी टाळाव्यात.१०.] चार तासाच्या अंतराने थोड थोड खाव. ११.] सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेत फिराव.


Diabetes

Diabetes mellitus, often simply referred to as diabetes, is a group of metabolic diseases in which a person has high blood sugar, either because the body does not produce enough insulin, or because cells do not respond to the insulin that is produced. As of 2000 at least 171 million people worldwide have diabetes, or 2.8% of the population.Type 2 diabetes is by far the most common, affecting 90 to 95% of the U.S. diabetes population.
There are three main types of diabetes: Type 1 diabetes: results from the body's failure to produce insulin. Type 1 diabetes is partly inherited and then triggered by certain infections,
Type 2 diabetes: results from insulin resistance, a condition in which cells fail to use insulin properly, sometimes combined with an absolute insulin deficiency. Type 2 diabetes is due primarily to lifestyle factors and genetics.
Gestational diabetes: is when pregnant women, who have never had diabetes before, have a high blood glucose level during pregnancy. It may precede development of type 2 DM.
Diabetes is a chronic disease which cannot be cured except in very specific situations. Management concentrates on keeping blood sugar levels as close to normal as possible, without causing hypoglycemia. This can usually be accomplished with diet, exercise, and use of appropriate medications. Patient education, understanding, and participation is vital since the complications of diabetes are far less common and less severe in people who have well-managed blood sugar levels.
The goal of treatment is an HbA1C level of 6.5%, but should not be lower than that, and may be set higher. Attention is also paid to other health problems that may accelerate the deleterious effects of diabetes. These include smoking, elevated cholesterol levels, obesity, high blood pressure, and lack of regular exercise.
more reference http://en.wikipedia.org/wiki/Diabetes