भूकंप 

पृथ्वीचे अंतरंग क्रस्ट, मॅन्टल, आउटर कोअर,आणि इनर कोअर अशा चार भागात विभागलेल आहे. १.] क्रस्ट म्हणजे पृथ्वीच बाह्य आवरण. ते साधारण १०० किमी. खोलीच असून टणक आहे. २.] मॅन्टल द्रवरुप असून ते १०० किमी पासून २९०० किमी.पर्यंत खोल आहे. ३.] आउटर कोअरची खोली २९०० किमी पासून ५१०० किमी पर्यंत असून तो भाग द्रवरूप आहे.  ४.] इनर कोअरम्हणजे पृथ्वीचा गाभा. ५१०० किमी पासून ६३७८ किमी पर्यंतच्या प्थ्वीच्या केंद्रापर्यंत पसरलेला हा भाग द्रवरूप आहे.
              पृथ्वीच्या बाह्य आवरणात अनेक प्लेट्स असतात.  त्यापैकी जगभरातील बारा प्लेट्स महत्त्वाच्या आहेत. या बारा प्लेट्स एकमेकांवर, एकमेकांच्या खाली किंवा एकमेकांच्या बाजूने सरकत असतात. या सरकण्यामुळेच पृथ्वीच्या बाह्य आवरणाचा आकार सतत बदलत असतो. या हालचालींमुळे प्रस्तरामध्ये फार मोठ्याप्रमाणावर ताण आणि उर्जा साठू लागते. हा ताण असह्य झाला कि, प्रस्तरांचे थर तडकतात आणि उर्जा कंपनाच्या रूपाने बाहेर पडते. यालाच भूकंप असे म्हणतात. ज्या ठिकाणी प्रस्तराला तडे जातात त्या भागाला "फॉल्ट प्लेन" म्हणतात.आणि भूगर्भात ज्या ठिकाणी भूकंपाची सुरुवात होते त्याला "फोकस'' किंवा ''भूकंपाचा केंद्रबिंदू''असे म्हणतात. हा केंद्रबिंदू भूगर्भाच्या आत शेकडो किमी असू शकतो. या केंद्रबिंदूच्या अगदी वर असणारा पृथ्वीचा पृष्ठभाग "एपिसेंटर" म्हणून ओळखला जातो. भूकंपमुळे "बॉडी वेव्हज" आणि "सर्फेस वेव्हज" असे दोन प्रकारचे कंप निर्माण होतात. पृथ्वीच्या गर्भात होणार्‍या कंपांना बॉडी वेव्हज तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण होणार्‍या कंपांना सर्फेस वेव्हज असे म्हणतात.
निरनिराळ्या क्षमतेचे हजारो भूकंप पृथ्वीवर होत असतात. "सेस्मॉग्राफ" नावाच्या यंत्राच्या सहाय्याने भूकंपाच्या नोंदी केल्या जातात. "मॅग्नीट्यूड" आणि "इन्टेन्सिटी" म्हणजेच क्षमता आणि तीव्रता अशा दोन मानकात भूकंप मोजतात. १.] मॅग्नीट्यूड म्हणजे भूकंपाच्यावेळी पृथ्वीच्या पोटातून किती उर्जा बाहेर पडते ते मोजण. मॅग्नीट्यूड मोजण्यासाठी "रिश्टर स्केल" हे एकक वापरले जाते. रिश्टल स्केल जेंव्हा एक युनिटने वाढते तेंव्हा बाहेर पडलेली उर्जा दहा पटीने वाढलेली असते. २.] इन्टेन्सिटी :- पृथ्वीचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पोटात किती खोल आहे,  भूकंपाच्या कंपनलहरींच म्हणजेच बॉडी वेव्हज आणि सर्फेस वेव्हजच स्वरुप कस आहे हे जाणून घेण म्हणजे इन्टेन्सिटी. ती "एमएसके" स्केलवर मोजतात. भूकंपाच्या एपिसेन्टरपासून लांब जाव तसतशी भूकंपाची विनाशकारी शक्ती कमीकमी होत जाते.


Earthquake

An earthquake is also known as a quake, tremor or temblor. It is the result of a sudden release of energy in the Earth's crust that creates seismic waves.
In its most general sense, the word earthquake is used to describe any seismic event — whether natural or caused by humans — that generates seismic waves. Earthquakes are caused mostly by rupture of geological faults, but also by other events such as volcanic activity, landslides, mine blasts, and nuclear tests. An earthquake's point of initial rupture is called its focus or hypocenter. The epicenter is the point at ground level directly above the hypocenter.
At the Earth's surface, earthquakes manifest themselves by shaking and sometimes displacement of the ground. When the epicenter of a large earthquake is located offshore, the seabed may be displaced sufficiently to cause a tsunami. Earthquakes can also trigger landslides, and occasionally volcanic activity.
In Greek mythology, Poseidon was the cause and god of earthquakes. When he was in a bad mood, he struck the ground with a trident, causing earthquakes and other calamities. He also used earthquakes to punish and inflict fear upon people as revenge.
The largest earthquakes in historic times have been of magnitude slightly over 9, although there is no limit to the possible magnitude. The most recent large earthquake of magnitude 9.0 or larger was a 9.0 magnitude earthquake in Japan in 2011 (as of March 2011), and it was the largest Japanese earthquake since records began. Intensity of shaking is measured on the modified Mercalli scale. The shallower an earthquake, the more damage to structures it causes, all else being equal.
Refer - http://en.wikipedia.org/wiki/Earthquake for more details