मसालेच मसाले भाग २ 

१.] तंदूरी मसाला:- अर्धा टी स्पून सुंठ पावडर, अर्धा टी स्पून आमचूर, दोन ती स्पून लाल तिखट, एक टी स्पून शहाजिर, दोन-तीन दालचिनी तुकडे, सात-आठ लवंगा, तीन चार मसाला वेलदोडे, एक टी स्पून त्यार गरम मसाला, अर्धा टी स्पून पुदीना पावडर.
२.] छोल्यासाठी गरम मसाला :- दहा हिरवे वेलदोडे, दीड टी स्पून शहाजिरे, एक टी स्पून जिरे, दीड टी स्पून मिरे, अर्धा टी स्पून लवंगा, दोन तुकडे दालचिनी, एक तमालपत्र, पाव टी स्पून सुंठ पावडर.
३.] सिंधी गरम मसाला :- शंभर गॅम मिरे, शंभर गॅम जिरे, शंभर गरग्रॅम दालचिनी, पन्नास ग्रॅम लवंग, पन्नास ग्रॅम वेलची, पाच तमालपत्र पाने. [ सर्व कच्चे कुटून घेणे.]
४.] धनशाक मसाला :- [पाव किलो डाळीसाठी] एक टी स्पून मेथी, एक टी स्पून जिरे, एक टी स्पून फुटाणे, एक टी स्पून सांबार मसाला, एक टी स्पून मिरी पावडर, एक टी स्पून लसूण पेस्ट, चार-पाच तुकडे दालचिनी, तीन लाल मिरच्या, एक ते दीड टी स्पून गरम मसाला.
५.] रसम मसाला :- सात-आठ लाल मिरच्या आणि अर्धा टी स्पून हिंग चमचाभर तेलावर थोडे परतवून घ्यावे. त्याच कढईत पाव वाटी धणे, एक टी स्पून जिर, एक टी स्पून मिरी, एक टी स्पून हरभरा डाळ, तीन टी स्पून तूरडाळ, पाव टी स्पून हळद, चार-पाच वाललेली कधीलिंबाची पाने, परतविन गार झाल्यावर पावडर करावी.
६.] लिंबू लोणच्याचा मसाला ;- एक टी स्पून मेथी, आणि एक टी स्पून हिंग, दोन -तीन टी स्पून तेलावर परतावे. त्यात दोन टी स्पून तिखट, एक टी स्पून हळद घालुन मिक्सरवर दळावे. पावा वाटी गरम करून गार केलेल्या तेलात वरील मसाला व आठ चमचे मीठ घालावे. [ दहा लिंबाच्या फोडी मिसळाव्या.]
७.] मिरचीच्या लोणच्याचा मसाला ;- एक टी स्पून मेथी पावडर, एक टी स्पून हिंग पावडर, एक टी स्पून हळद आणि अर्धी वाटी मोहरीची डाळ यांच भरडसर मिश्रण, अर्धी वाटी मीठ, अर्धी वाटी लिंबाचा रस कोमट तेलात सर्व मसाला मिसळून घ्यावा.[ पाव किलो मिरच्या चिरून त्यात वरील मिश्रण मिसळावे. ]
८.] कैरी लोणचे मसाला ;- एक टे स्पून मेथी, एक टे.स्पून हिंग थोड्या तेलावर परतवून घ्यावे. त्यात पाऊण वाटी मोहरी डाळ, एक वाटी लाल तिखट, एक टे. स्पून हळद मिसळवून सर्व मसाला कालवावा. [ एक किलो कैरीच्या फोडी त्यात मिसळाव्या.]
९.] सांबार मसाला :- अर्धी वाटी चणाडाळ, अर्धी वाटी उडीद डाळधूवून वाळवून थोड्या तेलात परतवून घ्याव्यात. दोन टे.स्पून काळे मिरे, दोन टे. स्पून मोहरी, दोन टे. स्पून मेथी दाणे, दोन टे. स्पून हळद, अर्धा किलो लाल मिरच्या, पाव किलो धणे, शंभर ग्रॅम जिरे,तळलेली दोन टी. स्पून हिंग पावडर आणि भाजलेल्या दोन्ही डाळी एकत्र कुटून घ्यावे.
१०.] करी पावडर :- शंभर ग्रॅम धणे, पन्नास ग्रॅम सुक्या मिरच्या, पंचवीस ग्रॅम मिरे, दोन टी स्पून खसखस, दोन टी स्पून जिरे, दोन टी स्पून शहाजिरे, दोन टी स्पून चणाडाळ, एक टी. स्पून मोहरी, दोन टी.स्पून तीळ, सात आठ लवंगा, सात-आठ वेलदोडे, पाच-सहा दालचिनीचे तुकडे, सर्व एकत्र कुटावे.
११.] थंडाई मसाला :- दोन टी स्पून खसखस, दोन टी स्पून मगज, चार-पाच हिरवे वेलदोडे, चार टीस्पून बडीशेप, दहा-बारा बदाम, एक वाटी गुलाबाच्या सुक्या पाकळ्या, एक टी स्पून मिरे. हे सर्व पदार्थ एक वाटी पाण्यात भिजत घालून मग वाटावे. [ दोन लिटर दूधासाठी ]


A spice may be available in several forms: fresh, whole dried, or pre-ground dried. The flavor of a spice is derived in part from compounds that oxidize or evaporate when exposed to air. Grinding a spice greatly increases its surface area and so increases the rates of oxidation and evaporation. Thus, flavor is maximized by storing a spice whole and grinding when needed. The shelf life of a whole spice is roughly two years; of a ground spice roughly six months. The "flavor life" of a ground spice can be much shorter. Ground spices are better stored away from light. To grind a whole spice, the classic tool is mortar and pestle. Less labor-intensive tools are more common now: a microplane or fine grater can be used to grind small amounts; a coffee grinder is useful for larger amounts. A frequently used spice such as black pepper may merit storage in its own hand grinder or mill. Some flavor elements in spices are soluble in water; many are soluble in oil or fat. As a general rule, the flavors from a spice take time to infuse into the food so spices are added early in preparation. Refer - http://en.wikipedia.org/wiki/Spice for more details