खजुराहोची मंदिरे 

भारतात उत्तरप्रदेशमध्ये झांशी रेल्वे स्थानकापासून जवळच खजुराहो गावात अप्रतिम अशी मंदिरे स्थापत्यकला, शिल्पकला यांचा उत्कृष्ट नमुना म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. खजुराहो गावाच्या पश्चिमेला मातंगेश्वरराचे मंदीर, लक्ष्मण मंदिर, कंदारीय महादेवाचे मंदिर, चित्रगुप्त मंदिर, चौसष्ट योगिनी मंदिर, जगदंबा मंदिर, विश्वनाथ मंदिर अशा सात मंदिरांचा समूह आहे.
मातंगेश्वराचे मंदीर हे येथील ग्राम दैवत आहे. मातंगेश्वराच्या मंदिरात शिरण्याआधी शेंदूराने लालभडक केलेली लालभैरवाची मूर्ती दिसते. त्यानंतर मातंगेश्वराच मंदिर उंच चौथर्‍यावर उभ असलेल दिसत. त्याच्या पायर्‍या चढून गेल्यावर सभामंडप व गर्भगृह लागते. त्याच ठिकाणी जवळ जवळ आठ फूट उंचीचे एक शिवलिंगमातंगेश्वराच्या मंदिराच्या बाजुला लक्ष्मण मंदिर आहे.           त्याच्या बाजुला एकतीस मीटर उंचीचे भव्य असे कंदारीय महादेव मंदिर आहे . या मंदिरात भगवान
शिवाची मूर्ती आहे. याच्या गर्भ गृहातील तोरण आणि छतावरच दगडी झुंबर पहाण्यासारख आहे. या
मंदिरात अप्रतीम मिथुन शिल्प, तसेच अप्सरा देवीदेवता यांची अलंकरणयुक्त शिल्प पहायला मिळतात. कंदारीय महादेव मंदिराच्या चौथर्‍यावरच ग्रॅनाइट दगडापासून तयार केलेल चौसष्ट योगिनी मंदिर आहे. या मंदिरात देवी कलिकेची मूर्ती आहे. या मंदिरातही मिथुन शिल्प, अप्सरा देवीदेवतांची शिल्प आढळतात. चौसष्ट योगिनी मंदिराच्या बाजुला थोड्या अंतरावर चित्रगुप्त मंदिर आहे. हे मंदिर सूर्यदेवाला समर्पित असून मम्दिराच्या गर्भगृहात सात घोड्यांच्या रथावर स्वार झालेली पाच फूट उंचीची सूर्यदेवाची मूर्ती आहे. या मंदिरातील शिल्पांमध्ये मिरवणुका, नृत्यसभा अदिंचा समावेश आहे. चित्रगुप्ताच्या मंदिरानंतर लागते भव्य अस विश्वनाथाच मंदिर. नंदादीप, भोगमंडप, सभामंडप, गर्भगृह यांनी युक्त असलेले हे मंदिर चौथर्‍यावर उभे आहे. चौथर्‍याच्या पायर्‍यांवर दोन्ही बाजुंना भव्य असे हत्ती व सिंह आहेत. पायर्‍या चढून वर गेल्यावर स्वतंत्र अस नंदीमंदिर आहे. त्यात एकाच दगडात कोरलेला नंदि बसलेल्या अवस्थेत आहे. विश्वनाथ मंदिरात ब्रह्माची तीन शिर असलेली मूर्ती आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारातील व छतावरील तोरण, झुंबर तांची नक्षी अप्रतिम  आहे. विश्वनाथ मंदिराच्या बाजुला जगदंबेच मंदिर आहे. त्यात एकच गर्भगृह आहे. स्थापत्यकलेने सजलेले हे मंदिरही वैशिष्ट्यपूर्ण आहे.
             खजुराहो गावाच्या पूर्वेलाही मंदिरंचा समूह आहे त्याला पूर्वी समूह असे म्हटले जाते. या समुहामध्ये पार्श्वनाथ मंदिर, घंटाई मंदिर, आदिनाथ मंदिर, ब्रम्हदेवाचे मंदिर, वामन मंदिर, जवारी मंदिर यांचा समावेश होतो. यापैकी सर्वात मोठ असलेले पार्श्वनाथाचे मंदिर नाजूक कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. पार्श्वनाथाच्या मंदिराजवळ घंटाई हे जैनांचे मंदिर आहे. ही देवी गरुडावर आसनस्थ झालेली अशी आहे. भगवान महावीरांच्या आईची सोळा स्वप्न या मंदिरावरील शिल्पात साकारण्यात आली आहेत. कोरीव कामासाठी प्रसिद्ध असलेले आदिनाथ मंदिर घंटाई मंदिराच्या बाजुला आहे. मंदिराचे शिखर, भिंती, खांब, दरवाजे सार्‍यावर देवदेवता , यक्षयक्षिणी यांच्या शिल्पांबरोबरच सुंदर कलाकुसर केलेली आहे. चौमुखी ब्रम्हदेवाची मूर्ती असलेल ब्रम्हदेवाच मंदिर आणि त्याबाजुच वामनाच मंदिरही पहाण्यासारख देखण आहे.
       खजुराहो गावाच्या दक्षिणेला दुल्हादेव नावाच महादेवाच मंदिर आणि चतुर्भुज विष्णूच मंदिरही शिल्पकलेने नटलेल आहे.