तरस 

            स्वभावतःच असलेला क्रूरपणा, अस्वच्छपणा यामुळे इंग्रजी भाषेत तरसाला " हायना " असे नामकरण करण्यात आले आहे. कुत्र्यासारखा दिसणारे हे प्राणी सामान्यतः गटागटाने रहात असलेले आढळतात. तरस ठिपक्या-ठिपक्याचे, रेघारेघांचे किंवा चॉकलेटी रंगाचे असे तीन प्रकारात अढळतात. त्यांचे कान तिखट व नजर तीक्ष्ण असते. त्यामुळे रात्रीच्या अंधारातही त्यांना स्पष्ट दिसू शकते. तरस खूप वेगाने, न दमता पळू शकतात. तरसाचे वजन साधारणतः पन्नास ते शहाऐंशी किलो पर्यंत असू शकते. तरसाचे आयुष्यमान पंचवीस वर्षांपर्यंत असते. तरसाचे दात तीक्ष्ण व अणकुचीदार असतात. त्यांची पचनशक्तीही जबरदस्त असते. त्यामुळेच शिकार केलेल्या भक्ष्याची हाड, शिंग, दातसुद्धा मासांबरोबर खाऊन तरस पचवू शकतात. आश्चर्याची बाब म्हणजे तरस अ‍ॅल्युमिनियमची भांडीही खाऊन पचवू शकतात असे म्हणतात. एकावेळी साडेकिलो अन्न त्यांच्या पोटात तरस साठवू शकतात. तरस शिकार करण्यात अतिशय तरबेज असतात. सांबर, म्हशी, हरण यासारख्या मोठ्या प्राण्यांबरोबरच पक्षी, साप, कीडे, सरडे यासारखे छॉडे प्राणीही ते पकडून खातात. याव्यतिरिक्त तरस जमिनीत पुरलेली प्रेतेसुद्धा उकरून खातात. तरसांची भूक जितकी जबरदस्त असते तितकेच ते कित्येक तास उपाशीही राहू शकतात. तरसांच्या ओरडण्याचा आवाज तीन मैलांपर्यंत ऐकू येतो. त्यांच्या आवाजाचे साम्य माणसांच्या हसण्याच्या आवाजाशी आहे. तरसांच्या मलमूत्र विसर्जनाच्या जागाही ठरलेल्या असतात.
तरसाची मादी बहुतेकवेळा दोन पिल्लांना जन्म देते. पण दुर्दैवाने या जुळ्यांपैकी बहुतांशी एकच पिल्लू जगते.