चित्ता 

जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा प्राणी म्हणजे चित्ता. केवळ तीन सेकंदात तो ११० किमी अंतर पार करू शकतो. चित्त्याच्या अंगावर असणार्‍या ठिबक्यांमुळे त्याला चित्ता हे नाव मिळाले. चित्त्याच्या अंगावर मोठे मोठे ठिपके असतात. त्याच्या तोंडावर या ठिपक्यांची संख्या खूपच कमी असते.त्याच्या डोळ्यांखाली सुरू होणारी काळ्या रंगाची रेघ तोंडापर्यंत गेलेली असते. चित्त्याच डोक शरिराच्या आकाराच्या मानाने खूप लहान असत. चित्याची नजर खूप तीक्ष्ण असते.चित्त्याच वजन सर्वसाधारणतः चाळीस ते पासष्ट किलो असत. त्याची लांबी ४५इंच ते ५३ इंच इतकी असून शेपटीची लांबी सुमारे तीन फूट असते. परंतु चित्त्याच शरीर लवचिक असत. पळताना तो लांब लांब ढांगा टाकत पळतो. पळताना त्याचे चारही पंजे तो अर्ध्यापर्यंत मुडपू शकतो. त्याची फुप्फुसे मोठी असल्याने त्याला धाप लागत नाही. चित्त्याचे दात लांब व तीक्ष्ण नसले तरी ते भेदक असतात. त्यांच्या सहाय्याने तो गळा आवळून भक्ष्याला ठार मारू शकतो. चित्ता एका वेळी तेरा किलो मांस फस्त करू शकतो. आणि पाच पाच दिवस उपाशीही राहू शकतो.चित्त्याची मादी तीन महिन्याच्या गर्भधारणेनंतर तीन ते पाच पिल्लांना जन्म देते. वर्ष सव्वा वर्ष आईकडे राहिल्यानंतर पिल्लू दुसरीकडे निघून जाते. या काळात मादी आपल्या पिल्लांना शिकार कशी करायची, मांस कस खायच हे शिकवते.
             अफ्रिकेत सुमारे पंच्याहत्तर लाख ते दोन कोटी वर्षापूर्वी उत्क्रांतीतून जन्मला आलेली ही प्राण्याची जात आज मात्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तिला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.