देवीचे अवतार 

नवरात्रीचा उत्सव हा अश्विन शुद्ध प्रतिप्रदे पासून सुरू होतो. नवरात्रीत देवीच्या नऊ रुपांची पूजा होते. त्या नऊ रुपांबद्द्ल थोडी महिती खालील प्रमाणे:
१.] शैलपुत्री :-  वृषभावर आरुढ झालेल्या या देवीच्या डाव्या हातात त्रिशूळ व उजव्या हातात कमल पुष्प धारण केलेले असते. ही देवी दक्ष राजाची पुत्री असून तिचा विवाह भगवान शंकराशी झाला होता. तिचे नाव देवी सती असे होते. दक्ष राजाने यज्ञाच्या वेळी आपल्या जावयाला म्हणजे शंकराला आमंत्रण दिले नाही. आपल्या पतीचा झालेला हा अपमान सहन न होऊन देवी सतीने यज्ञकुंडात आहुती दिली होती.
२.] ब्रम्हचारिणी :-  ब्रम्हचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. ब्रम्हचारिणीने तीन हजार वर्ष जमिनीवर पडलेली बेलाची पाने खाऊन शंकराची आरधना केली.म्हणून तिचे नाव अपर्णा  असे पडले. तिला उमा म्हणूनही संबोधले जाते.
३.] चंद्रघंटा :-  या देवीच्या रुपाला दहा हात आणि तीन डोळे आहेत. ही देवीची स्थिती युद्धाच्या तयारीत असल्यासारखे असली तरी हिची मुद्रा शांत आणि सौम्य अशी आहे.
४.] कुष्मांडा :-  असे म्हट्ले जाते कि या देवीने तिच्या स्मित हास्यातून सृष्टीची निर्मिती केली आहे. हिला आदिशक्ति म्हणूनही  संबोधले जाते. या देवीला आठ भुजा आहेत आणि कमंडलू ,धनुष्य, बाण, कमलपुष्प , चक्र, गदा, कलश आणि जपमाळ अशी साधने धारण केली आहेत.
५.] स्कंदमाता :- स्कंदमाताचा वर्ण शुभ्र असून तिच्या मांडी वर स्कंद कुमार म्हण्जेच  कार्तिकेय आरुढ आहे. या देवीच्या हातात कमलपुष्प, वरमुद्रा आहेत. ही देवी कमलपुष्पावर विराजमान आहे. या देवीचे वाहन सिंह आहे.  या देवीला "पद्मासना "असेहि नाव आहे.
६.] कात्यायनी :- महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला होता; तेव्हा भगवान ब्रम्हा, विष्णू, महेश या  तिघांनी  आपल्या अंशानी या देवीची निर्मिती केली, महर्षी कात्यायनी यांनी हिची  पहिल्यांदा पूजा केली; म्हणून या देवीला कात्यायनी असे नाव पडले आहे. असेही म्हणतात कि ही देवी ॠषी कात्यायनी यांची पुत्री आहे. या देवीचे वाहन सिंह असून या देवीने कमळ आणि तलवार धारण केली आहे  .या देवीला चार भूजा आहेत.
७.] कालरात्री :-  या देवीचा रंग काळा असून केस विस्कटलेले आहेत. हिचे नाव "शुभंकरी" असेही आहे. या देवीचे वाहन गर्दभ आहे. या देवीला चार भूजा असून या देवीच्या रुपाने लोखंडी कत आणि खड्ग धारण केले आहे.
८.] महागौरी :- ही देवी शुभ्र वर्णाची असून हिचे वस्त्र आणि अलंकार शुभ्र आहेत. हिचे वाहन वृषभ आहे. महागौरीच्या चार भुजा आहेत. तिने त्रिशुळ आणि डमरु धारण केले आहे. अशी कथा आहे कि या देवीने शंकराचे कठोर तप केले आणि त्या तपाने ती काळी पडली. तिच्या या तपाने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तिचे अंग गंगेच्या पवित्र पाण्याने धुतले. त्यामुळे तिची कांती शुभ्र आणि तेजस्वी झाली.
९.] सिद्धिदात्री :- या देवीला चार भूजा असून तिचे वाहन सिंह आहे. अशी आखयिका आहे कि, भगवान शंकराने सर्व सिद्धी या देवीच्या अनुकंपेने प्राप्त केल्या. या देवीच्या अनुकंपेने भगवान शंकराचे अर्धे शरीर देवीचे झाले. म्हणूनच भगवान शंकराला अर्धनारिश्वर असे म्हणतात.
.