दसरा...पुराणातील कथा 

दुर्गासूर नावाच्या राक्षसाने ब्रह्म देवाची  कठोर उपासना करुन असा वर मिळवला की त्रिभुवनात त्याला जिंकणारा एकही वीरपुरूष असणार नाही. अजिंक्य ठरलेल्या दुर्गासूराने देवांना तसेच इतर मनुष्यप्राणिमात्रांना त्रास देण्यास सुरवात केली. त्याने थोड्याच अवधीत इंद्राशी युद्ध पुकारले. ह्या युद्धात त्याचा विजय झाला. त्याने इंद्र, चंद्र, वरुण आणि इतर देवांना कैद केले आणि तो स्वत: देवनगरीचा  राजा झाला. ब्रह्मा, विष्णू, महेश असे तीनही देवसुद्धा त्याला शरण आले.
सतरेशेवटी सर्व देव आदिशक्तीला शरण गेले. आदिशक्ती जगदंबेने सांगितले " मी स्वतः अवतार घेउन दुर्गासूराचा वध करेन. त्यासाठी अश्विन शुक्ल प्रतिप्रदा ते अश्विन शुद्ध नवमी या दिवसात
घटस्थापना करुन माझी मनोभावे पूजा करा आणि निश्चिंत रहा."आदिशक्तीचे हे बोलणे  ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश आनंदित झाले. आदिशक्तिला शंकराने त्रिशूळ, विष्णूने सूदर्शनचक्रआणि कवच,        यमाने भाला, अग्निने गदा, सूर्याने भाता भरुन बाण, वरुणाने शंख, इंद्राने वज्र अशी शस्त्रे दिली.
ही सर्व शस्त्रे घेउन आदिमाता युद्धास तयार झाली. तिने स्त्री सेना तयार केली. असुरांना आव्हान केले. ते पाहून महिषसूर हसू लागला. आणि म्हणाला " या बायका काय मला हरवणार? माझी सेना पाहून त्या तर भीतीने पळून जातील." त्याचे हे गर्वाचे बोल एकून देवी क्रोधीत झाली.आणि तिने उग्र रुप धारण केले. अश्विन शुक्ल प्रतिप्रदेला युद्धास सुरुवात
 झाली. दोन्ही ही सैन्यामध्ये युद्ध चालू झाले. देवीने कधी वाघावर, कधी सिंहासनावर, तर कधी गरूडावर  बसून; कधी दोन्ही हातात शस्त्रे घेऊन तर कधी रणचंडी होउन असुरांना पळ्वून लावले. नऊ दिवस नऊ  रात्र विश्रांती न घेता युद्ध चालू होते. अखेर दहाव्या दिवशी महिषासूर मरण पावला. तिन्ही लोक निर्भय  झाले. देवीचा जयजयकार झाला. आणि तिला "विजया" असे संबोधले जाऊ लागले. तो शुभ दिवस   दशमीचा होता.म्हणूनच दसरा हा सण "विजयादशमी" म्हणून ओळखला जातो.


Dasara

Dasara is one of the popular, colourful and enthralling festivals of India celebrated with great joy and enthusiasm. It is also known as "Vijayadashami". This festival is celebrated to mark the victory of good over evil.. Dusserah (Dasara) literally means the tenth day. It marks the end of the nine days of Navaratri. The first nine nights are spent in the worship of goddess Durga and hence these nights are known as Navaratri. According to mythology, the Devi assumed nine forms to accomplish the task of winning over evil. Hence these nine forms are worshipped during the nine days of festival . and The 10th day is celebrated as Dasara. According to Hindu mythology, Lord Rama killed Ravana, the king of Lanka on the tenth day of their battle in Satya Yug . Hence that day of victory came to be known as Vijayadashami literally means the Victory on the Tenth Day. Dasara is also believed to have marked the end of the exile and banishment of the Pandava princes in Mahabharata and their return with their weapons to reclaim their kingdom from Kauravas.