दसरा सण मोठा!!! 

अश्विन शुक्ल दशमीला दसरा हा सण येतो. सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुष्टांचा संहार करण्यास देवीने  नऊ अवतार घेतले. आणि सतत नऊ दिवस युद्ध करुन दहाव्या दिवशी दुर्गासूर म्हण्जेच महिषसूराचा वध केला.  म्हणूनच दसरा ह सण विजयादशमी या नावाने ही ओळखला जातो.
हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक दिवस म्हणून मानला जातो. या दिवशी सरस्वतीपूजन करण्यात येते.  ह्य दिवसाला खूप मह्त्त्व आहे; कारण या दिवशी कौत्स्याने सुवर्ण मुद्रा लुटल्या. तसेच श्री रामाने  रावणावर ह्याच दिवशी विजय मिळवला. पांडवानी ह्याच दिवशी शमीच्या झाडावरुन शस्त्रे घेतली. आणि रघुराजा ही याच दिवशी सारे जग जिंकायला निघाला. म्हणूनच दसरा हा सण शुभ मानला जातो.
दसरा हा सण फक्त भारतातच नाही तर बांगलादेश, नेपाळ मधे ही साजरा केला जातो. या सणा च्या सुमारास भातशेती तयार होते. म्हणूनच या सणाच्या दिवशी भाताच्या लोंब्याचे झेंडूच्या फुलांचे तोरण दारात लावण्यात येते. ह्या दिवशी आपट्याच्या झाडाची पाने लुटून ती वाटायची प्रथा आहे. परंतु ग्लोबल वर्मिंग च्या अनुशंगाने ह्या प्रथेचा पुन्नर्विचार करणे गरजेचे आहे. ह्या सणाच्या निमित्ताने झाडे तोडणे आणि झाडाची पाने ओरबाडणे उचित नाही.  हा सण आनंद निर्माण करुन तो इतरांबरोबर वाटण्याचा आहे ही बाब प्रत्येकाने लक्षात ठेवावयास हवी.


Dasara

Dasara is one of the popular, colourful and enthralling festivals of India celebrated with great joy and enthusiasm. It is also known as "Vijayadashami". This festival is celebrated to mark the victory of good over evil.. Dusserah (Dasara) literally means the tenth day. It marks the end of the nine days of Navaratri. The first nine nights are spent in the worship of goddess Durga and hence these nights are known as Navaratri. According to mythology, the Devi assumed nine forms to accomplish the task of winning over evil. Hence these nine forms are worshipped during the nine days of festival . and The 10th day is celebrated as Dasara. According to Hindu mythology, Lord Rama killed Ravana, the king of Lanka on the tenth day of their battle in Satya Yug . Hence that day of victory came to be known as Vijayadashami literally means the Victory on the Tenth Day. Dasara is also believed to have marked the end of the exile and banishment of the Pandava princes in Mahabharata and their return with their weapons to reclaim their kingdom from Kauravas.