ओझोन वायू आणि फ्रेऑन वायू 

फिकट निळ्या रंगाचा, तिखट वास असणारा, आणि झोंबणारा ओझोन नावाचा वायू ऑक्सिजनच्या तीन अणूंपासून बनलेला असतो. हा वायू अस्थिर असतो. तो जेवढ्या वेगाने तयार होतो; तसाच वेगाने नष्टही होतो. तो उत्तम ऑक्सिडाइझिंग वायू असून उच्च तापमानाला त्याचे एकदम विघटन होते.वातवरणात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात हा वायू आढळतो. पण पृथ्वीपासून १० ते १५ किमी उंचीच्या प्रदेशात त्याचे प्रमाण अधिक असते. प्रावरणातील अतिनील किरणांच्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनचे विघटन झालेले ऑक्सिजनचे अणू वातवरणातील इतर ऑक्सिजनशी संयोग पावतात. त्यातूनच ओझोन तयार होतो. वातावरणातील ओझोनचा ऑक्सिजनच्या विघटित झालेल्या एका अणूशी संयोग झाला की पुन्हा त्याचे रुपांतर ऑक्सिजन मध्ये होते. ओझोन हा जीवरक्षक वायू आहे. सूर्याकडून पृथ्वीवर येणार्‍या लघुतरंग उर्जेतील 'अल्ट्राव्हायोलेट' किरणांचे शोषण करून पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण ओझोन वायूकडून होत असते.
निसर्गात पूर्वी कधीही नसलेला हा फ्रेऑन नावाचा वायू सन १९३० मध्ये अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ मिडग्ली यांनी तयार केला.तो पूर्णपणे मानव निर्मित आहे.कार्बन, क्लोरिन, आणि फ्लोरिन यांच्या संयोगातून तयार झालेल्या या वायूच कित्येक वर्ष विघटन होत नाही. हा वायू ज्वलनशील नाही. तो विषारी नाही आणि कोणत्याच रासायनिक क्रियेत तो भाग घेत नाही. आपण निर्माण केलेला हा वायू निरुपद्रवी व सुरक्षित आहे हे दाखवून देण्यासाठी मिडग्ली यांनी एक प्रयोग करून दाखवला. त्यांनी फ्रेऑन वायू तयार करून श्वास घेतला. आणि तो पेटत्या मेणबत्तीवर सोडला. मेणबत्ती विझली पण मिदग्ली यांना काहीही झाले नाही. त्यामुळे साहजिकच या फ्रेऑनचा वापर सर्रास सुरु झाला. रेफ्रिजरेट, एअरकंडिशनर, स्प्रे-कॅन्स इत्यादी गोष्टीत त्याचा वापर केला जाऊ लागला.
परंतु १९३० मध्ये निरुपयोगी ठरलेला या वायूचे प्रताप चाळीस-पनास वर्षांनी लक्षात येऊ लागले. मानवाने हवेत सोडलेला हा फ्रेऑन वायू हळूहळू वातावरणात उंच चढत जाऊन ओझोनच्या थरापर्यंत पोहोचतो असे लक्षात आले. तेथे सूर्यकिरणातील अतिनील किरणांमुळे फ्रेऑनच्या रेणूंच रासायनिक पृथक्करण होत. व त्यातील क्लोरिनचे अणू मोकळे होतात. अशारितीने मोकळा झालेला क्लोरिनचा प्रत्येक अणू ओझोनच्या रेणूंशी रासायनिक दृष्ट्या संयोग पावतो आणि ओझोनच्या रेणूंच ऑक्सिजनच्या रेणूत रुपांतर करतो. व पुन्हा स्वतः या प्रक्रियेत जिवंत होतो. आशाप्रकारे फ्रेऑनचा एक अणू ओझोनचे कितीतरी अणू नष्ट करतो. त्यामुळे पृथ्वीभोवतीच्या ओझोनच्या संरक्षक कवचाला तडे जाऊ लागले आहेत.सूर्यप्रकाशातील अतिनील किरण शोषून घेणारा हा ओझोनचा थर नष्ट झाला तर त्याचे घातक परिणाम मानवाला भोगायला लागणार आहेत.
अशाप्रकरे मानवाने तयार केलेला फ्रेऑन वायू आणि निसर्गतःच तयार झालेला ओझोन वायू यात जमीन अस्मानाचा फरक आहे.