वाळू 

सागराच्या अथांग पाण्याला थोपवून धरणार्‍या,मुलायम हळूवार स्पर्शाच्या वाळूबद्दल मला विलक्षण  कुतुहल आहे. ओल्या वाळूचे किल्ले बांधताना आणि कोरडी वाळू मुठीत घेऊन बोटांच्या फटीतून सोडताना मिळणारा अवर्णनीय आनंद शब्दात व्यक्तच करता येणार नाही. एका बाजुला लांबवर पसरलेला समुद्र दुसर्‍या बाजुला आकाशाला स्पर्शायला निघालेली नारळाची झाडे या दोहोमध्ये विसावलेल्या या वाळूची निर्मिती कशी झाली असेल असा प्रश्न मला नेहमी पडे. शेवटी वाळूसंबंधी माहिती माझ्या हाताला लागली.
आज पृथ्वीवर जी वाळू पसरलेली आहे ती सुमारे अडीच अब्ज वर्षापूर्वी बनलेली आहे. पृथ्वीवरील ग्रानाईट खडकापासून बनलेला वाळूचा कण म्हणजे क्वार्टझचा स्फटिक असतो. शाश्वतपणाच लेण घेऊन आलेला हा कण इतका टणक असतो की तो कधी नष्ट होणे शक्य नाही. ग्रानाईटचे खडक मुख्यतः क्वार्टझ आणि फेल्स्पार नावाच्या स्फटिकांचे बनलेले आहेत. यापैकी फेल्स्पारचे स्फटिक ठिसूळ असतात. ते पाण्यात विरघळतात. शिवाय इतर क्षारांची रासायनिक क्रियाही त्यांच्यावर होते. त्यामुळे त्यांची चिखल माती तयार होते. आता राहिलेले क्वार्टझचे स्फटिक हे टणक असतात. लाव्हारसापासून जेंव्हा ग्रानाइट खडकाची निर्मिती झाली तेंव्हा त्यातील क्वार्टझचा स्फटिक थोडा मोठा होता. कालांतराने खडक थंड होताना हा क्वार्टझचा स्फटिक आक्रसला गेला. आणि आक्रसताना शेजारच्या स्फटिकापासून वेगळा झाला. हे ग्रानाईटपासून वेगळे झालेले क्वार्टझचे स्फटिक म्हणजेच वाळूचे कण. अशाप्रकारे डोंगरापासून अलग झालेले वाळूचे कण मग पाण्याच्या प्रवाहाबरोबर समुद्राच्या दिशेने वहातात. किंवा वार्‍याबरोबर वहात जाऊन वाळवंट तयार करतात. समुद्रावरची वाळू काय किंवा वाळवंटातली वाळू काय शेवटी सर्व क्वार्टझचे स्फटिकच. समुद्राच्या उंच उंच लाटा पाण्यातील वाळूच्या कणांना काठावर आणून टाकतात आणि छानसा समुद्र किनारा तयार होतो. तर वाळवंटातील वारा वाळूच्या कणांना उंचचउंच उडवून वाळूची वादळे निर्माण करतो. कधीकधी वाळवंटातही पाण्यासारखे वाळूचे भोवरे तयार होताना दिसतात.वाळूचे कण मातीच्या कणांसारखे एकमेकांना चिकटून बसत नसल्याने अशा वादळांच्या वेळी वाळवंटात वाळूच्या उंच उंच आणि मैलोनमैल पसरलेल्या लाटाही तयार होतात.


Sand

Sand is a composed of finely divided rock and mineral particles. It is naturally occurring granular material. The composition of sand is highly variable, as the local rock sources and conditions defer. The most common constituent of sand is silica (silicon dioxide, or SiO2), usually in the form of quartz.