मसालेच मसाले भाग १ 

१.] पंजाबी मसाला :-  ४ टेबलस्पून धणे, ४ टॅबलस्पून जिरे, ८ टेबलस्पून आमचूर, २ टेबलस्पून तिखट, ४ चमचे सूंठ पूड, ४ चमचे मिरपूड, २ चमचे हिंग, १६ बडी वेलची, ८ तमालपत्र, ८ टेबलस्पून पुदिन्याची सुकलेली पाने, ४-५ दालचिनीचे तुकडे आणि ४ टेबलस्पून सैंधव.

२.] पंजाबी गरम मसाला :-  १ वाटी धणे, अर्धी वाटी बडीशेप, ३० लवंगा, १५ तुकडे दालचिनी, थोडी जायपत्री, २ जायफळे, २ टेबलस्पून शहाजिरे, पाव वाटी जिरे, २ टेबलस्पून मिरे, १० बडी वेलची, १५-२० वेलदोडे, २ चमचे सूंठपूड, १० तमालपत्र, अर्धी वाटी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या.

३.] कोल्हापुरी मसाला :-  ३ वाट्या खोबर्‍याचा भाजलेला किस, ४ कांदे बारीक चिरून उन्हात वाळवून लालसर तळलेले, २ लसणीचे कांदे सोलून तळलेले, १५-२० लवंगा, ५-७ दालचिनीचे तुकडे, २ चमचे बडीशेप, २ चमचे काळे मिरी, ३-४ वाटी धणे, ३ टेबलस्पून जिरे, १ वाटी लाल तिखट. [ सर्व मसाला तेलावर परतून मग वाटावा.]

४.] मालवणी मसाला :-  ५०० ग्रॅम बेडगी मिरची, १२५ ग्रॅम धणे, ३० ग्रॅम काळे मिरे, ३० ग्रॅम खसखस, ३० ग्रॅम जिरे, ६० ग्रॅम बडीशेप, १ चमचा हिंग, ३ टेबलस्पून हळद, ५ ग्रॅम लवंगा, ५ ग्रॅम दालचिनी, ५ ग्रॅम,तमालपत्र, ५ ग्रॅम शहाजिरे, ५ ग्रॅम तिरफळे, थोडे दगडफूल.

५] कोकणी मसाला :-  ५०० ग्रॅम धणे, ५०० ग्रॅम मिरच्या, ५० ग्रॅम लवंग, ५० ग्रॅम जायपत्री, ५० ग्रॅम नागकेशर, ५० ग्रॅम मसाला वेलची, ५० ग्रॅम दालचिनी, ५० ग्रॅम दगडफूल, ५० ग्रॅम तमालपत्र, ५० ग्रॅम बडीशेप, ५० ग्रॅम काळे मिरे, ५० ग्रॅम जिरे, ५०ग्रॅम शहाजिरे, ५० ग्रॅम मोहरी, २०० ग्रॅम खसखस, १५ हळकुंडे, १ चमचा मेथी, १ टेबलस्पून हिंग, २ जायफळे.

६.] वैदर्भीय मसाला :-  २५० ग्रॅम धणे, २५ ग्रॅम जिरे, ५ ग्रॅम लवंगा, ५ ग्रॅम दालचिनी, ५ ग्रॅम नागकेशर, ५ ग्रॅम मिरे, ५ ग्रॅम दगडफूल, ५ ग्रॅम तमालपत्र, ५ ग्रॅम जायपत्री, १ जायफळ, २५ ग्रॅम खसखस, ५० ग्रॅम खोबरे, ५० ग्रॅम तीळ, ५० ग्रॅम चणाडाळ. [ सर्व साहित्य तेलावर भाजून वाटावे.]

७.] बिर्याणी पुलाव मसाला :-  १२-१५ हिरवी वेलची, ८-१० लवंगा, २टी स्पून शहाजिरे, ७-८ जायपत्री, थोडे जायफळ, २ मोठे तुकडे दालचिनी, २०-२५ काळे मिरी, २-३ तमालपत्री, २ टी स्पून केशर.

८.] पावभाजी मसाला :-  ५० ग्रॅम धणे, ५० ग्रॅम काश्मिरी मिरची, १० ग्रॅम लवंगा, १५ ग्रॅम वेलची, ५-६ तमालपत्रे, २ टी स्पून सूंठ पावडर, २ टी स्पून आमचूर पावडर, २ टी स्पून काळे मीठ, २५ ग्रॅम जिरे, २५ ग्रॅम दालचिनी, १५ ग्रॅम काळे मिरी, १ टेबलस्पून शहाजिरे, २ टेबलस्पून बडीशेप, २ टेबलस्पून डाळींब दाणे, १ टेबल स्पून हळद पावडर, भाजण्यासाठी थोड तेल.

९.] पाणीपुरी मसाला :-  २५ ग्रॅम भाजलेले धणे, २५ ग्रॅम भाजलेले जिरे, १ टेबलस्पून काळी मिरी, ७-८ लवंगा, १ चमचा काळे मीठ, ४ टेबलस्पून साधे मीठ, २ टॅबल स्पून आमचूर पावडर, २ टी स्पून मिरची पावडर, १ टी स्पून सूंठ पावडर, २ तमालपत्र, १ मोठा तुकडा दालचिनी.  [या सर्वांची पावडर करावी ] ताजी कोथिंबीर, हिरवी मिरची, पुदिना थोडी आल-लसूण या सर्वांची पेस्ट.

१०.] चाट मसाला :-  ५० ग्रॅम जिरे, २५ ग्रॅम धणे, २० ग्रॅम बडीशेप, १५ ग्रॅम काळी मिरी, १० ग्रॅम ओवा, १५ ग्रॅम अनार दाणे, २ग्रॅम दालचिनी, २ ग्रॅम लवंगा, १० ग्रॅम सूंठ पावडर, ५० ग्रॅम आमचूर पावडर, १० ग्रॅम मिरची पावडर, ५ ग्रॅम हिंग, १२५ ग्रॅम साधे मीठ, १ टेबल स्पून काळे मीठ, १०-१२ वेलची, २ तमालपत्रे, २५ ग्रॅम सुकी पुदिन्याची पाने, बारिक तुकडा जायफळ, १ चमचा सायट्रीक अ‍ॅसिड.

११.]  चहा मसाला :-  ३०० ग्रॅम सुंठ, १०० ग्रॅम हिरवी वेलची, ५० ग्रॅम लवंगा, १५० ग्रॅम काळी मिर्री, ५० ग्रॅम दालचिनी. [ सर्व भाजून ]

१२.]  दूध मसाला :-  १०० ग्रॅम बदाम, २५ ग्रॅम चारोळी, १ टेबलस्पून वेलची पावडर, १०० ग्रॅम पिस्ता, २ ग्रॅम केशर,  अर्धा चमचा जायफळ पावडर.[ चारोळी सोडून सर्व भाजून पावडर करावी.]