लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख 

लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म १८ फेब्रुवारी, इ.स. १८२३ रोजी झाला. ते महाराष्ट्रातील अगदी पहिल्या पिढीतील समाजसुधारक! गोपाळरावांनी धार्मिक समजुती आणि चालीरीती यांच्या वर्चस्वाविरुद्ध लढा दिला. त्यांच्या पुढाकाराने ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश आणि लोकहितवादी ही नियतकालीके चालू झाली. इ.स. १८७७ साली ब्रिटिश शासनाने ‘रावबहादूर’ ही पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते.


१८४८ पासून त्यांनी ‘लोकहितवादी’ या नावाने ‘प्रभाकर’ या साप्ताहिकात लेखन सुरू केले.बालविवाहामुळे काय अडचणी होतात हे त्यांनी प्रभाकरमध्ये पत्र लिहून लोकांच्या नजरेस आणले.  समाजातील बालविवाहहुंडाबहुपत्नीकत्व यांसारख्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी लेख लिहुन हल्ला चढविला. इ.स. १८४८ ते इ.स. १८५० या काळात ‘प्रभाकर’ या साप्ताहिकातून  त्यांनी १०८ समाजसुधारणाविषयक निबंध लिहिले. हेच निबंध ‘शतपत्रे’ नावाने प्रसिद्ध आहेत. 


 इ.स. १८६७ साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉजेस् जज्ज म्हणून काम करण्यास सुरुवात केली. गुजरातमधील वास्तव्यात त्यांनी गुजराती वक्तृत्वसभा आणि  प्रार्थना समाजाची स्थापना केली. त्यांनी, गुजराती व इंग्रजी भाषेत ‘हितेच्छु’ नावाचे साप्ताहिक काढले.