उपयुक्त पालेभाज्या 

आपल्या आहाराचे पिष्टमय , नत्रयुक्त, चरबीयुक्त, क्षार, जीवनसत्वे, व पाणी हे घटक आहेत. त्यापैकी क्षार व जीवनसत्वे आपल्याला ताज्या भाज्यांमधून मिळतात. आपल्या शरिराच्या वाढीसाठी क्षार व जीवनसत्वे गरजेची आहेतच पण आपल्या आहारातील इतर घटकांच्या पोषणासाठीही त्यांची गरज असते. प्रथिनांच्या पचनासाठी 'अ' जीवनसत्व, कर्बोदकांच्या पचनासाठी 'ब' जीवनसत्व तर स्निग्ध पदार्थांच्या पचनासाठी 'ई' जीवनसत्वाची गरज असते. शिवाय हाडांच्या बळकटीसाठी 'ड' जीवनसत्व, रक्ताची घनता ठराविक प्रमाणात ठेवण्यासाठी 'के' जीवनसत्व आणि या सर्वांना सावरणार अस 'क' जीवनसत्व आपल्याला अहारातून मिळणे गरजेच असते. ही सारी जीनवसत्वांची गरज आपण विविध पालेभाज्यांमधून भागवू शकतो. याशिवाय पालेभाज्यांमध्ये विविध खनिज, ,एन्जाइम्सही विपुल प्रमाणात असतात. पालेभाजीची उपयुक्तता वाढवणारा आणखी एक घटक म्हणजे त्यात असलेला चोथा. या चोथ्यामुळे शरिरात घाण साठून रहात नाही. आतडी कार्य्क्षम रहातात. आतड्यातीलआवश्यक जीवजंतूंची पैदासही या चोथ्यामुळेच होते. त्यामुळेआपण खालेल्याअन्नाच्या विविध घटकांचे अगदी शेवटपर्यंत नेऊन पचन करण शरिराला सहज शक्य होत. शिवाय आतड्यात तयार होणारे पित्तासारखे विषमय पदार्थही या चोथ्यामुळे बाहेर टाकणे शक्य होते. अशाप्रकारे अगदी कमी किमतीला मिळणार्‍या पालेभाज्या आपल्या आहारात नित्य असणे गरजेचे आहे. काही पालेभाज्यांचे औषधी उपयोग पुढीलप्रमाणे आहेत.
१.]   कोथिंबीर :-  उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे.
२.]   कढीलिंब ;-  पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो.
३.]   पालक :- मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे.
४.]  माठ  :-  हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते.
५.]  चाकवत :- ही पचण्याला सुलभ असून ज्वरनाशक आहे. त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे. ही भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे.
६.]   हादगा :- खोकला, पित्त, हिवताप कमी करणारी ही भाजी आहे. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा नाहीसा होतो असे म्हणतात. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ लवकर सुटतो. 
७.]   अळू  :-  याच्या पानांचा व दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखमा लवकर भरून येतात. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होते.
८.]  अंबाडी :-  मीरपूड व साखर यांच्याबरोबर अंबाडीचा रस प्राशन केल्यास तो पित्तनाशक ठरतो.
९.]  घोळ :-  मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त आहे. शिवाय ती खाल्ल्यामुळे लघवीला साफ आणि भरपूर होते.
१०.]  टाकळा :- सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांच्या पीठ अशक्तपाणा कमी करण्यास उपयुक्त आहे.
११.]  मायाळू :-  अंगावर पित्त उठले असताना याच्या पानांचा रस आंगाला चोळल्यास पित्त कमी ह्प्ते. लहानमुलांना थंडी खोकला झाला असताना मायाळूच्या पानाचा रस चमचाभर देतात.
१२.]  तांदुळजा :-  बाळंतीणीला दूध वाढवण्यास ही भाजी उपयोगी ठरते.
१३.]  मेथी :-  सारक व पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण बरेच आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो.
१४.] शेपू ;-  वातनाशक व पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे.
१५.] शेवगा ;-  ही भाजी वातनाशक व पित्तनाशक आहे. हृदय व रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारतात.
१६.] सॅलड :-  या भाजीमध्ये लेसीथीन नावाचे द्रव्य असते. मजासंस्थेचे कार्य सुधारण्यास त्यामुळे मदत होते. मेंदूवर जास्त ताण पडणार्‍यांनी नियमित सॅलड खावे.