बांबू 

टोपल्या, खुर्च्या, पेट्या, पलंग, घरे आदि अनेक वस्तू ज्यापासून बनवल्या जातात तो बांबू ही एक गवताची जात आहे. बंबूलाच कळक असे दुसरे नाव आहे. युरोप सोडून सर्वत्र आढळ्णारे हे बांबू अनेक रंगात आणि आकारात आढळतात. बांबूच्या अनेक जाती आहेत. काही जाती चार ते सहा इंच उंचीच्या तर काही जाती शंभर फूटापेक्षाही अधिक उंचीच्या असतात. बांबूची वाढ जलद गतीने होते.हिरवीगार लांबट पाने त्याला येतात. साधारण फेब्रुवारी महिन्यात त्यांची पतझड होते. आणि पावसाळा सुरू झाला की पुन्हा बांबूचे कोंब जमिनीतून वर येतात. बांबूच्या काही जाती तर दिवसाला चार फुटापर्यंतही वाढतात असे वाचनात आले आहे. बांबूच्या झाडांना त्यांच्या प्रकारांनुसार चाळीस ते एकशेवीस वर्षांनी एकदाच फुल येतात. आणि असा फुलोरा येऊन गेला की बांबूच झाड मृत होत. बांबूच्या कोवळ्या कोंबाची जशी भाजी करतात तसेच त्याच्या बियांच्या पीठापासून भाकरीही बनवतात.