गोमूत्र आणि गोमय 

                खरतर मलमूत्र म्हणजे " शी! घाण " अशीच भावना सामान्यतः असते. पण गायीचे मलमूत्र याला अपवाद आहे. हिंदू धर्मात ते पवित्र मानलेले आहे. याचे कारण या दोन्ही घटकांत औषधी गुणधर्म पुष्कळ प्रमाणात आहेत. गोमूत्र पिण्याची, आणि गोमूत्र शिंपडून घर शुद्ध करण्याची प्रथा भारतात हजारो वर्षापासून आहे; ती याचसाठी. गोमूत्रातील औषधी गुणधर्मांचा विचार करूनच बहुतेक औषधे गोमूत्र उकळवून त्याची वाफ थंड करुन मिळालेल्या आर्क नावाच्या पदार्थापासून बनविली जातात. काहीसे तुरट, तिखट तेलकट चवीचे गोमूत्र गॅस, अ‍ॅसिडीटी,खोकला, अस्थमा, डायरिया, रक्तदोष संधीवात, पार्किन्स, हेपेटायटिस, टक्कल पडणे, काविळ, रक्तक्षय, त्वचाविकार,सर्पदंश अशा अगणित आजारांत वापरले जाते. ते उत्तम पाचक आहे. जखम भरून काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कारण ते विषाणूरोधक, बुरशीरोधक आहे. सौंदर्यप्रसाधान साबण बनवण्यासाठी त्याचा वापर करतात.गोमूत्रामध्ये अनेक बॅक्टेरियांनी तयार केलेल्या अ‍ॅन्टी बायोटिकची क्षमता क्षीण करण्याची ताकद आहे. पेशीविभाजन रोखण्यासाठी गोमूत्राचा उपयोग होऊ शकतो म्हणून गोमूत्र अर्काचा वापर कर्करोग निवारण औषधांमध्येही केला जातो. गोमूत्रामध्ये टि.बी. निवारण करणारे औषधी घटकही आढळतात. गोमूत्र पेशीच्या आवरणातून सहजतेने प्रवाहित होऊन जाऊ शकते. त्यामुळे गोमूत्र प्राशनाने पेशींची कार्यक्षमता वाढून रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. गोमूत्र भूक वाढविणारे पण कफ आणि वात या दोषांचे शमन करणारे असे द्रव्य आहे. गोमूत्रामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, कारबानिक अ‍ॅसिड, सल्फर, फॉस्फेट, मँगनीज, नायट्रोजन, पोटॅश पोटॅशियम, युरिया, युरिक अ‍ॅसिड, अमिनो अ‍ॅसिडस, एन्झाइम्स, लॅक्टोज, सिटोकिन्स, सिलोकिन्स, खनिज मिश्रणे, अशी अनेक उपयुक्त द्रव्ये व पाणी असते. त्यामुळेच गोमूत्र प्राशनने शरिरात कमी झालेली द्रव्ये भरून निघतात. अर्थात गोमूत्र प्राशन करताना ते ताजे असावे, निरोगी गायीचेच असावे. गोमूत्र साठवून ठेवताना ते तांबे, पितळ अथवा प्लास्टिकच्या भांड्यात न ठेवता स्टील किंवा चिनीमातीच्या भांड्यात ठेवावे. गोमूत्र प्राशन करण्यापूर्वी आणि प्राशन केल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ नये. हल्ली गोमूत्र पावडर स्वरूपात उपलब्ध आहे. पांढर्‍या रंगाची रवाळ पावडर पाण्यामध्ये विरघळणारी अशी आहे. गोमूत्राचा मावा करून तो चिवट होईपर्यंत उकळला जातो. मग त्यात हळद टा़कून त्याच्या गोळ्या केल्या जातात त्यावर बाष्पाचा परिणाम होऊ नये म्हणून त्या शेणाच्या राखेत मिसळल्या जातात. अशा गोमूत्र धनवटींचा वापर त्वचारोग, संधीवात, रक्तदाब आदी आजारात होतो.वैज्ञानिक पद्धतीने गोमूत्र शुद्ध करून त्याचा उर्ध्वपातन पद्धतीने अर्कही बनविला जातो. आणि विविध औषधे तयार करण्यासाठी तो वापरला जातो. गूळ व गोमूत्र यापासून आसव तयार करण्यात येते.गोमूत्र व हिरडा यापासून तयार केलेले गोमूत्र हरितकी हे औषध मूळव्याध, सूज, मधुमेह, सांध्याची सूज अशा विकारात उपयुक्त आहे. गोमूत्र, कडुलिंब व अन्य वनौषधीं यांच्या मिश्रणातून उत्कृष्ट किटकनाशक तयार करण्यात येते. शेतात त्याचा वापर केला जातो. सेंद्रियखत बनवितानाही गोमूत्र वापरण्यात येते. गोमूत्रात समुद्राचे पाणी आणि यीस्ट मिसळले तर ते उत्प्रेरकाचे काम करते. या उत्प्रेरकात खराब ,उजाड जमिनीला हिरवेगार बनविण्याची क्षमता आहे. जमिनीचा कसही त्यामुळे वढतो.
              गोमय म्हणजे गायीचे शेण. हेसुद्धा औषधी गुणांनी परिपूर्ण असे आहे. प्राचीन ग्रंथात गायीच्या शेणात लक्ष्मी वास करते असे म्हटलेले आढळते. चरकसंहितेत "प्रवरम जीवनीयम क्षीरमुक्तम रसायन" म्हणजे जीवनशक्ती वाढवणारे श्रेष्टतम रसायन असा शेणाचा उल्लेख केलेला आहे.हाताला थंडगार लागणारे हे शेण १०२ डिग्री तापमानाचे असते. ते उत्तम जंतुनाशक आहे. शेणामध्ये नायट्रोजन, पोटॅश, मिथेल, ग्लुकोज असतेच शिवाय अन्य उपयोगी खनिजे देखील असतात.त्यामध्ये अँन्टिसेप्टिक व अँन्टिरेडिओअ‍ॅक्टिव्ह आणि अ‍ॅन्टिथर्मल गुण असतात. शेणामुळे किरणोत्सर्गापासून रक्षण होते म्हणूनच पूर्वीच्या काळी घर, अंगण, चूल, भिंती शेणाने सारवत असत. माती आणि शेण यांचे मिश्रणात सिमेंटसारखे गुणधर्म तयार होतात. आणि शेणातील अ‍ॅन्टिसेप्टिक गुणामुळे घरात किडे, माशा, डासांना प्रतिबंध आपोआपच होत असे.  शेणामुळे मातीतील चिकटपणा व स्निग्धता कमी होऊन तिची पाणी शोषणाची क्षमता वाढते हे लक्षात घेऊन पूर्वी धान्य साठवण्याच्या भांड्यांनाही माती व शेणाचा लेप लावीत असत. गायीचे शेण, माती, गवत एकत्र करून पूर्वी गोवर्‍या करीत असत. त्या जाळल्यामुळे हवेतील विषाणूंचा नाश होई. व पर्यावरण शुद्ध होण्यास मदत होई. म्हणून धार्मिक विधीमध्ये गोवर्‍यांचा वापर केला जाई. तापमान नियंत्रित राखण्यासही त्याचा उपयोग होई. या गोवर्‍या किंवा शेणी जाळून केलेल्या अन्न पदार्थातील पोषक तत्त्व नष्ट होत नाहीत असे आढळून आले आहे. आज ग्रामीण भागात गोबर गॅस बनवण्यात येऊन त्याचा स्वयंपाकघरात इंधन म्हणून वापर केला जातोच पण त्याबरोबर त्यापासून वीज निर्मिती करून त्यावर विविध उपकरणेही चालविली जतात. मलेरिया, टि.बी.तसेच त्वचारोगांवर प्रभावी औषध म्हणून गोमयाचा वापर केला जातो. आज गायीच्या शेणापासून साबण, दंतमंजन, धूपबत्ती, उटणे, मलम,हवन सामग्री, आदि अनेक उत्पादने बनविली जातात. तलावात गायीचे शेण मिसळले तर त्यातील पाण्याची आम्लीयता कमी होते. ग्रामीण भागात गायीच्या शेणाचा शेती सुधारणेमध्ये मोलाचा वाटा आहे. शेणखतामुळे मातीचा दर्जा सुधारतो.जमिनीचा कस वाढून पिकांची वाढ चांगली होते. जमिनीची कीटक प्रतिरोधक क्षमता वाढते.
                  गायीच्या मलमूत्राचे गुणधर्म अणि नानाविध उपयोग पाहिल्यानंतर "गोष्ठो वै नाम एषा लक्ष्मी | " म्हणजे गोठा हीच लक्ष्मी हे ऋषीमुनींचे म्हणणे सर्वार्थाने पटते.