खान अब्द्दुल गफारखान 

' बादशहाखान ' तसेच ' सरहद्द गांधी ' म्हणून ओळखल्या जाणार्या अब्द्दुल गफारखान यांचा जन्म सन १८९० मध्ये पेशावरजवळील उत्तमानझाई नावाच्या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ' बहरामखान ' असे होते. बहरामखान हे उत्तमनझाई गावाचे प्रमुख होते. अब्द्दुल गफारखानांच प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावीच झाल. आणि पुढील शिक्षणासाठी ते पेशावरच्या मिशनस्कूलमध्ये दाखल झाले. शिक्षणकार्य व सामाजिक कार्याकडे वळण्याची प्रेरणा गफारखानांना याच शाळेतील मुख्याध्यापक फादर विग्रॅम यांच्याकडून मिळाली.गफारखानांच त्या पुढील शिक्षण अलिगड्ला झाल.
अलिगडहून परत आल्यावर गफारखानांनी सरहद्दप्रांतात आपल्या पुश्तू या मातृभाषेतून शिक्षण देणार्‍या राष्ट्रीय  शाळा काढल्या. आणि त्याद्वारे पाठाण बांधवांमध्ये राष्ट्रीय  भावना निर्माण केली. खान अब्द्दुल गफारखान महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाले होते. आपल्या सहकार्‍यांसह ते काँग्रेसचळवळीत भाग घेऊ लागले. असहकार चळवळ, खिलाफत चळवळ, सविनय कायदेभंग सत्याग्रह, वैयक्तिक सत्याग्रह आणि चलेजाव आंदोलनात राहून त्यांनी देशकार्यात हातभार लावला. अनेक वेळ त्यांना तुरूंगवास भोगावा लागला. तुरूंगात असताना त्यांनी हिंदूंचा धर्मग्रंथ 'भगवद गीता', मुसलमानांचे कुराण, ख्रिश्चनांचे 'बायबल', आणि पारशी धर्माचे 'ग्रंथसाहेबा' यासार्‍यांचा अभ्यास करून सर्व धर्मांची मूलतत्त्वे सारखीच आहेत हे जाणले.
सन १९२९मध्ये गफारखानांनी " खुदाई खिदमतगार " नावाची संघटना उभारली. या संघटनेचे स्वयंसेवक लाल रंगाचे अंगरखे वापरत म्हणून त्यांना " लाल डगलेवाले " असेही म्हणत असत. अहिंसा, शिस्त, स्वावलंबन ही यासंघटनेची वैशिष्टे होती. साहजिकच पठाणांसारख्या लढावू व्त्तीच्या लोकांना शांततेच्या मार्गाने आचरण करायला लावणारे खान अब्द्दुल गफारखान सर्वांच्या कौतुकाच विषय बनले. गफारखानांच्या नेतृत्वामुळेच सीमाप्रांत काँग्रेसच्या बाजुला वळला. गफारखानांच कार्य लक्षात घेऊन त्यांना सन १९३४ मध्ये राष्ट्रीय सभेच अध्यक्षपद देण्यात आल. पण पैसा व सत्ता यांचा अजिबातच लोभ नसणार्‍या गफारखानांनी ते  पद नाकारल. त्यांनी स्वयंसेवक रहाणच पसंत केल.
कोणत्याही धर्माच्या आधारावर राष्ट्राची उभारणी करणे गफारखानांना मान्य नव्हत. त्यामुळेच देशाच्या फाळणीला त्यांचा संपूर्ण विरोध होता. भारत आणि पाकिस्तान फाळणीमुळे त्यांना अत्यंत दु:ख झाल. फाळणीनंतर आपल सार आयुष्य त्यांनी पठाण बांधवांच्या सेवेत अर्पण केले. सन १९८७ मध्ये भारत सरकारने " भारत रत्न " हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. २० जानेवारी सन १९८८ मध्ये खान अब्द्दुल गफारखान यांनी या जगाचा निरोप घेतला.