कालमापन 

प्रवासात  असताना " इथून दृष्ट काढते, निमिष एक थांब तू " या गाण्याच्या ओळी ऐकू आल्या. गाण संपल तरी ही एकच ओळ मी कितीतरी वेळ गुणगुणत होते. पण त्यातील "निमिष" या शब्दाचा अर्थबोध मात्र बराच वेळ होत नव्हता. कालांतराने काही माहिती मिळाली. प्राचीन काळी ऋषीमुनींनी विश्वाचे कोडे उलगडण्यासाठी जी एकके तयार केली त्यातील जे सर्वात लहान एकक म्हणजे "निमिषार्ध". आपला आताचा एक सेकंद म्हणजे ३०० निमिषार्ध.यावरून प्राचीन काळात भारतात किती सूक्ष्म अभ्यास केला जात होता याची कल्पना येईल. आता या निमिषार्धापासून कालमापन कसे केले जात होते ते पाहू.
   १.)  निमिषार्ध म्हणजे अर्धे निमिष. 
        ३०० निमिषार्ध.  = १५० निमिषे. = १सेकंद.
        १ निमिष म्हणजे एका सेकंदाचा १५० व्वा भाग.
        ६० निमिषे = १ विपळ
        ६० विपळे = १ पळ = २४ सेकंद.
        ६० पळे = १ घटिका = १४४० सेकंद = २४ मिनिटे.
        ६० घटिका = १ दिवस = २४ तास.
याचाच अर्थ   १,२९,६०,००० निमिषे = १ दिवस =२४ तास = १४४० मिनिटे =८६४०० सेकंद.
     २.)  १ वर्ष =  ३६५ दिवस, ५ तास, ४३ मिनिटे, १२ सेकंद
            १ वर्ष =  ३, १५, ५६, ५९२ सेकंद.
            १ वर्ष =  ४, ७३, ३४, ८८, ८०० निमिषे. 
    ३.)   १७,२८,०००  वर्षे =  सत्ययुग.
            १२, ९६, ००० वर्षे = त्रेता युग.
            ८,६४,००० वर्षे =  द्वापार युग.
             ४, ३२, ००० वर्षे = कलियुग.
  सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, आणि कलियुग यांची मिळून एकूण ४३, २०, ००० वर्षे होतात. अशी बहात्तर चतुर्युगे म्हणजे एक मन्वंतर. याचाच अर्थ ३१, १०, ४०, ००० वर्षे  = १ मन्वंतर.
 अशी १४ मन्वंतरे = १ कल्प. म्हणजेच ४, ३५, ४५, ६०, ००० वर्षे = १ कल्प.
या १४ मन्वंतरांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
 १.)  स्वायंभूव.  २.)  स्वारोचिल.   ३.)  औत्तमी.  ४.)   तापस.  ५.)  रैवत.  ६.)   चाशुष.  ७.)  वैवस्वत.
 ८.) सावर्णी.  ९.)  दक्षसावर्णी.  १०.)  ब्रह्मसावर्णी.  ११.)  धर्मसावर्णी.  १२.)  रुद्रसावर्णी.  १४.) इंद्रसावर्णी.
सध्या सातवे वैवस्वत नावाचे मन्वंतर सुरू असून त्यातील अट्ठावीसावे युग म्हणगे कलियुग चालू आहे.