पु. भा. भावे 

            १२ एप्रिल १९१० रोजी महाराष्ट्रातील धुळे शहरात थोर साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर भावे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील व्यवसायाने डॉक्टर होते. वयाच्या आठव्या वर्षी मातृसुखाला वंचित झालेल्या भावे यांचा सांभाळ त्यांच्या आईच्या आईने केला. अतिशय द्वाड आणि बेदरकार स्वभाव असणारे भावे यांच्यावर आजीने हिंदू जीवनाचे व नैतिक मूल्यांचे संस्कार केले. १९३२ मध्ये मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर नागपूरच्या हिस्लाय महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. ची पदवी घेतली. सन १९३९ मध्ये ते एल. एल. बी. झाले. परंतु वकिलीची सनद घेऊनही त्यांनी वकीली मात्र केली नाही. स्पष्टवक्तेपणा, निर्भयता, निर्भिडता हे त्यांच्या स्वभावाचे विशेष पैलू होते. पुढे १९४३ मध्ये नागपूरच्या डॉ. नेरुरकर यांच्या कन्येशी ते विवाहबद्ध झाले.
            लेखन हे भाव्यांचे आयुअष्यभराचे व्रत होते. केवळ लेखनावर जगायच ही त्यांची जिद्द होती. पु. भा. भावे.यांची सहित्य संपदा विशाल व सर्वस्पर्शी अशी होती. १७ कादंबर्‍या, ६ नाटके, २ प्रवासवर्णन, २ व्यक्तिचित्रे, २८ कथासंग्रह, १८ लेखसंग्रह, निवडक कथा संग्रहाचे दोन भाग इतके त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले. त्यांचे "प्रथम पुरुष एकवचनी" नावाच्या आत्मचरित्राचे तीन खंडही प्रसिद्ध आहेत. याशिवाय 'सावधान' व 'आदेश' या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्या अमौलिक झुंजार पत्रकारितेचे दर्शन भाव्यांनी समाजाला घडवले. ते उत्कृष्ट तत्त्वचिंतक होते.
             पु. भा. यांचे नाव मराठी नवकथेचे जनक म्हणूनही घेतले जाते. कथालेखक म्हणून ते युगप्रवर्तक ठरले. त्यांच्या सतरा कादंबर्‍यानी मराठी भाषेत नवतारुण्य आणले. नाटककार म्हणून ते मखमली पडद्यावर आले. नंतर रजपटावर झळकले. आपल्या सर्व साहित्यात त्यानी जीवन व मृत्यु या सनातन प्रश्नांचा पाठपुरावा केला. विश्वाचा अफाट पसारा, मानवी बुद्धिचा कोतेपणा, ज्ञानेंद्रियांच्या मर्यादा याचे भान भाव्यांना होते. ते ईश्वरवादी होते. भविष्यात येऊ पहाणार्‍या विपरितांची जाणीव आपल्या लेखनातून या कर्तव्यदक्ष तत्त्वचिंतकाने देशवासियांना दिली होती. त्यांच्या सार्‍या लेखनात भावनांचा आवेग आहे. मातृभूमीसाठी सारसर्वस्व अर्पण करण्याची क्रांतीकारी बेभान वृत्ती आहे. आपल्या लेखणीला त्यांनी तलवारीची धार दिली.त्यांच्या सर्व लेखनात एक प्रकारचा कैफ, जोश आहे.तसेच मनस्वीपणा आणि मस्ती आहे. त्यामुळेच ते साहित्य उत्कृष्ट व मर्मस्पर्शी झाले आहे. पतिभा, पांडित्य आणि पौरुष यांचा सुरेख  संगम भाव्यांच्या लेखनात आढळतो. मानवाच्या बर्‍यावाईट सर्व प्रकृतीचा आलेख त्यांनी आपल्या  साहित्यातून मांडला. वाचकांचा जीवनानुभव त्यांनी समृद्ध केला.
            मे १९५४ मध्ये अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष झाले होते. १९६७ मध्ये विदर्भ साहित्य संमेलन, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे ते अध्यक्ष होते. नोव्हें. १९७७ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यानीच भूषविले होते.
            पु. भा. भावे यांचे वक्तृत्त्वही अमोघ होते. चौफेर वाचन, स्पष्ट उच्चार, स्पष्ट विचार, तीव्र  स्मरणशक्ती, इतिहासाचे अचूक ज्ञान, भाषाप्रभुत्त्व आणि तासनतास बोलण्याची क्षमता यामुळे लेखनाबरोबरच त्यांनी आपल्या वक्तृत्त्वाने लोकांची मने जिंकली होती.
            १३ ऑगस्ट१९८० रोजी या प्रतिभावान सहित्यिकाने जगाचा निरोप घेतला.


Purshottam Bhaskar Bhave

Honorable writer Purshtottam Bhaskar Bhave was born on April 12, 1910. His mother died when he was eight. His physician father Bhaskar Hari Bhave had remarried. However, Bhave could not get along with his father, who was a strict disciplinarian, and his stepmother; and his grandmother raised him. He received his college education at Hislop College and Law College in Nagpur. In 1930s, he ran in Nagpur periodicals ”Savdhan” and ”Adesh”, promoting his political views. Bhave wrote 17 novels, 6 plays, 2 screen scripts, 28 collections of his short stories, and 18 collections of his essays. He was a president of Akhil Bhartiya Natya Sanmelan” in year 1954 and also elected as President of Marathi Sahitya Sammelan in Pune in 1977. The collection of his political essays were published as “Rakta ani Ashru” which was received immense fame . Other popular novels of Mr. Bhave are Akulina,Darshan, Don Bhinti, Warshawa. His autobiography “Pratham-Purushi Ek-Wachani” is also popular amongst the readers. He died on August 13, 1980