हातांना मेंदी लावताना 

१) बाजारातील हिरव्या रंगाची पाच टी स्पून मेंदी पावडर मलमलच्या कापाडातून दोन वेळा गाळून घ्यावी.
२) एक कप पाण्यात १ टी स्पून चहा, १ टी स्पून कॉफी, २ ते ४ कुटलेल्या लवंगा घालून पाणी उकळावे.
३) वरील मिश्रण गार झाल्यावर गाळून घ्यावे.
४) गाळलेल्या वरिल मिश्रणात १ लिंबू, १० ते १२ निलगिरीचे थेंब टाकावे.
५) तयार झालेल्या मिश्रणात ५ टी स्पून गाळलेली मेंदीपावडर मिसळावी, व ती भरपूर फेटून घ्यावी.
६) मेंदी भिजवून २ ते ३ तास ठेवून मग ती मेंदी कोनात भरावी.
७) मेंदी काढण्यापूर्वीच डिझाईन ठरवून ठेवावे.
८) मेंदी काढताना प्रथम आऊटलाईन काढून घ्यावी नंतर त्यात बारीक नक्षी भरावी.
९) मेंदी लावून झाल्यावर अर्धे लिंबू व चिमूटभर साखर यांचे मिश्रण कपसाच्या बोळ्याने हाताला लावावे.
१०) मेंदी लावल्यानंतर ५ - ६ तासांनी हाताला गोडेतेल लावावे.
११) गरम तव्यावर लवंगा टाकून त्याच्या धुरावर मेंदी लावलेले हात धरावे व नंतर मेंदी खखडून काढावी.
१२) मेंदी धुतल्यावर हाताला साबण किंवा शॅम्पू लावू नये.