केसांना मेंदी लावताना 

१) केसांना मेंदी लावायच्या आदल्या दिवशी रात्री लोखंडी कढईमध्ये एक वाटी मेंदीपावडर मध्ये प्रत्येकी दोन चमचे आवळा, रिठा व शिकेकाई पावडर मिसळावी. नंतर १ चमचा लिंबूरस, अर्धा कप चहाचे पाणी घालावे. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून इडली पिठाप्रमाणे तयार करावे.
२) वरील मिश्रण रात्रभर तसेच ठेवावे.
३) दुसर्‍या दिवशी स्वच्छ धुतलेल्या केसांना हाताने किंवा ब्रशने  एकेक बट घेऊन मेंदी पसरावी
४) मेंदी लावलेल्या केसांना शॉवर कॅप किंवा फडके बांधून ठेवावे.
५) २-३ तासांनी मेंदी सुकल्यावर पाण्याने धुवावी.
६) हलकासा शॅम्पू लावण्यास हरकत नाही.
७) मेंदीचा लाल रंग केसांना येऊ असे वाटल्यास मेंदी करण्यापूर्वी केसांना थोडे तेल लावाले.