गुलाबाचे झाड लावताना 

१) गुलाबासाठी पाण्याचा निचरा होणारी लाल माती वापरावी.
२) गुलाब लावताना तीन भाग माती व दोन भाग खत असे प्रमाण ठेवावे.
३) गुलाब लावताना शक्यतो मातीची कुंडी वापरावी.
४) गुलाब लावताना कुंडीच्या बुडाला छिद्र पाडावीत.
५) गुलाब लावताना कुंडीत तळाला दीड इंच कोळसा व विटांचा थर व खताबरोबर मूठभर कडुलिंबाची पेंड घालावी.
६) गुलाबाच रोप निवडताना त्यावर रोग नाही ना ते पहावे.
७) रोप लावण्याआधी त्याला पाणी घालून ठेवावे.
८) गुलाबाचे रोप ज्या कुंडीत लावायचे त्याच्या आदल्या दिवशी कुंडीत पाणी घालून ठेवावे.
९) रोप लावल्यानंतर त्याच दिवशी त्याला पाणी घालू नये व कुंडी सावलीत ठेवावी. दुसर्‍या दिवशी उन्हात ठेवावी.
१०) गुलाबाच्या झाडाला कळ्या आल्या तर पहिले सहा महिने त्या खुडून टाकाव्या.
११) गुलाबाला आलेल पहिल फुल खुडल्यावर त्याखाली जिथे पान फुटणार तिथून फांदी सुरवातीला कापावी.
१२) गुलाब लावल्यावर दर आठवड्याला मातीची खुरपणी करावी.
१३) गुलाब लावल्यानंतर  तीन महिन्यांनी रोझ मिक्स हे रेडिमेड खत घालाव. त्यानंतर दर महिन्याने शेणखत व रोझमिक्स आळीपाळीने घालावे.
१४) गुलाबाचे रोप मे व ऑक्टोबर महिन्यात लावू नये.