पानाचे तबक 

१) सुपारी- समुद्रकिनारी उष्ण, दमट हवेत वाढणारी ही नारळासारखी झाडे आहेत. कच्ची सुपारी हिरवट रंगाची असते. पिकल्यावर पिवळसर करडी होते. त्यावर तंतूमय वेष्टन असते. आणि आकार अंड्याऐवढा असतो. हे तंतूमय वेष्टन काढून टाकले की आपण खातो ती सुपारी मिळते. सुपारीच्या प्रत्येक प्रकारात वेगळा वास असतो. सुपारी खाल्याने तोंडाला मंद सुगंध येतो व लाळ अधिक निर्माण होते.
            जंतविकारात सुपारी हे चांगले औषध आहे. सुपारी खाल्याने हिरड्या मजबूत होतात. दातांची कीड थांबते पण त्याचा अधिक वापर झाल्यास हिरड्या सुजतात, ढिल्या होतात व दात हलू लागतात. सुपारीमध्ये अर्कोलिन नावाचा रासायनिक घटक असतो; त्यामुळे अधिक सुपारी खाल्यास गालाचा किंवा जीभेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
२) काथ- 'अकारीया गॅबीएर' नावाच्या झाडाच्या फांद्या व पानांपासून काथ तयार करतात त्याचा रंग तपकिरी करडा किंवा तांबडटसर करडा असतो. काथाला कडू झणझणीत चव असते. काथ औषधी आहे. हिरड्या ढिल्या झाल्या असल्यास, तोंडात जखमा झाल्यास, जुलाब होत असल्यास काथ हे उत्तम औषध आहे.
३) विड्याचे पान- नागवेल नावाच्या वेलीची पाने विड्यासाठी वापरतात. हे पान उष्ण असते. जेवणानंतर तोंडाला चव यावी, पचनाला मदत व्हावी म्हणून ते खातात. याशिवाय त्याचे अन्य उपयोग आहेत. या पानामुळे यकृताचे कार्य सुधारते आवाज चांगला होण्यासाठी विड्याची पाने व कंकोळ एकत्रितपणे खातात. घशामध्ये खूप कफ साठला असेल तर २ चमचे विड्याच्या पानाचा रस व २ मिर्‍यांची पूड खडीसाखरेसह दिल्यास घसा साफ होतो. तूपाला वास येत असेल तर तूप गरम करून विड्यांची पाने त्यात टाकतात.
४) लवंग- आहारात चवीसाठी वापरली जाणारी लवंग पानामध्ये अल्पप्रमाणात वापरली जाते. लवंगेमध्ये अनेक औषधी गुण आहेत. लवंग कफकारक जंतूनाशक आहे. लवंगेमुळे हृदयाभिसरण चांगले होते. शरीरभर रक्त खेळवणार्‍या शिरांची आकुंचन प्रसरण पावण्याची शक्ती कमी झाली, तसेच शिरांच्या झडपा अशक्त झाल्यास लवंग काढा देतात. मूत्रपिंडातील व मूत्रमार्गातील दोष लवंगेमुळे दूर होतात. सतत तहान लागत असल्यास लवंगाच्या अर्काने युक्त पाणी प्यावे. दात दुखीवर लवंगतेल लावण्यात येते.
५) जायफळ- भारतात तामिळनाडू व कोकणच्या किनार्‍यावर जायफळाची लागवड जास्त प्रमाणात होते. ४० ते ६० फुट उंचीची ही झाडे सदाहरीत प्रकारात मोडतात याला पेरू एवढ्या आकाराची फळे येतात. या फळांची बी म्हणजे जायफळ. जायफळाला बाहेरून पातळ कवच असते. ते पिकले की जायफळ तयार झाले असे समजावे, जायफळ एक सुगंधी व तेलयुक्त बी आहे. ते औषधी आहे. मात्र अतिसेवन केले तर एकप्रकारची नशा, गुंगी येते .
            जायफळाची चव कडू, तिखट तुरट अशी मिश्र असते. उत्तेजक, मादक वेदनासारक व पौष्टीक असे जायफळ उष्ण असते. सामन्यतः अपचन, अतिसार, कॉलरा, आव पडणे , मळमळणे अशा पोटांच्या विकारात जायफळ अतिशय गुणकारी आहे. मेंदूला शक्ती प्रदान करण्याचे काम जायफळ करत नैराश्य, निद्रानाश, चिडचिडेपणा, इत्यादी मानसिक ताण कमी करण्यास जायफळ औषध आहे. दात व हिरड्यांच्या विकारातही ते उपयुक्त आहे. जायफळामुळे हृदय, यकृत, मूत्रपिंड, यांचे कार्य सुधारते.
           जायफ़ळामुळे पोटात अग्निदीपनाचे कार्य चांगले होते, तोंडाला चव येते, भूक लागते, ते कफवातहर आहे, मुखदुर्गंधी, कृमीरोग, खोकला, कृष्ठरोग, अतिसार इ. मध्ये गुणकारी आहे म्हणूनच खायच्याविड्यामध्य्ये त्याचा समावेश केला जातो.
६) गुलकंद - गुलाबपुष्पात शीतवीर्य असे औषधी द्रव्य असते. गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद बनवला जातो. उन्हाळा बाधू नये यासाठी गुलकंद वापरला जातो. उन्हाळ्यातील उष्ण व रुक्ष वातावरणामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम टळण्यासाठी तो लाभदायक असतो. रोज एक चमचा गुलकंद घेतल्यास डोळ्यांच्या तक्रारी दूर होतात. पित्ताचा त्रास कमी होतो.


Betel leaf

In India betel leaf is known as Paan. In india, Pakistan and South East Asia, the tradition of chewing betel leaf with areca nut and slaked lime paste, and katha (or kaatha) brown powder paste, with many regional and local variations is very popular. Even in weddings, cultural programs Paan is generally offered to guests. Betel leaf has medical properties and it is also used in cooking. Paan is evergreen and available all round the year. The leaves are glossy and heart shaped. It grows to about 1. 5 meter in height It is grown extensively in India though Malaysia is country of origin.