मीठ 

            आहारातील महच्वाचा घटक म्हणजे मीठ मिठाशिवाय अन्नाला चव नाही. मिठाचे प्रमाण  कमीजास्त झाल तर अन्नाची सारी चवच बिघडून जाते. म्हणूनच याला रसांचा राजा म्हणतात. समुद्रमंथनातून मीठ बाहेर आल अशी आरव्यायिका आहे. इस्लामी धर्माचा ज्ञानी पुरुष मोहम्मद यांनी देवान मानवजातीसाठी पाठवलेल्या चार अनमोल गोष्टी म्हणजे अन्नी, पाणी, लोखंड व मीठ असे म्हटले आहे. मांस टिकवण्यासाठी फार पूर्वीपासून मीठाचा वापर होत असे.
            नैसर्गिक मिठामध्ये सोडियम, पोटॅशियम,मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असत. याला शास्त्रीय भाषेत सोडियम क्लोराइड, लवण असे म्हटले जाते. हा घटक शरिराच्या सर्व भागात आढळतो. तो शरिरात पेशीबाहेर रहातो. पाण्याच्या चयापचयासाठी व वितरणासाठी हा घटक आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या रसावर तो नियंत्रण ठेवतो. जठरातील रस व पित्त बनवण्यास मदत करतो. या नैसर्गिक क्षारामुळे शरिरातील आम्ल संतुलित रहाते. मज्जारज्जू व मासपेशींचे कार्य यामुळे व्यवस्थित चालते.
            अर्थात मीठाचे प्रमाण आहारात चवीपुरताच असावे. त्याचे प्रमाण जास्त झाले तर शरिराच्या उत्सर्जन कार्यात अडथळा येतो. मीठ अधिक खाल्यामुळे पित्तप्रंकोप होतो, रक्ताच्या गतीमध्ये वाढ होते, तहान लागते, मूर्च्छा येते. दात पडतात, पौरुषत्त्व नष्ट होते, चेहर्‍यावर सुरकुत्या येतात, केस पांढरे होतात, जीभ कोरडी होते, मुत्रपिंडाचे कार्य वाढते हात, पाय चेहरा पोट यावर सूज येते.
            याउलट शरिरातील मीठाचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो, त्वचा ढिली पडते, पोटर्‍यामध्ये गोळे येतात. वजन कमी होते, डोळे खोल जातात. मानसिक दुर्बलता जाणवते.. रक्ताची घटना बदलते, लघवी कमी होते. हदयाच्या कार्यात फरक पडतो.
            पूर्वी काळे खडे मीठ मिळत असे. ते क्षारयुक्त होते. त्यात नैसर्गिक आयोडिन असे. पण आता पांढरे शुभ्र रिफाईंड मीठ मिळते व वरुन आयोडिन हा रासायनिक घटक मिसळला जातो. हे कृत्रिम मीठ शरीराला फारच घातक असते कारण त्यातील सर्व क्षारच नष्ट झालेले असतात. त्याचा वापर आहारात अगदी चवीपुरताच करणे योग्य आहे.
         खर पहाता भाज्या, पालेभाज्या, फळे, या नैसर्गिक खादयपदार्थात योग्य प्रमाणात मीठ असते. या भाज्या नैसर्गिक स्चरुपात कच्च्या खाव्यात आणि चिरण्यापूर्वी धुवाव्यात.
           आयुर्वेदात मीठाचे पाच प्रकार सांगितले आहेत. त्यांना 'पंचलवण' असे म्हणतात
१) सामुद्र - हे समुद्रापासून मिळत. समुद्र किनारी वाफे तयार करुन त्यात समुद्राच पाणी साठवल जात. सूर्याच्या उण्णतेने पाण्याची वाफ होते व मीठ खाली रहाते. मीठ तयार करणार्‍या अशा जागांना मिठागरे असे म्हणतात. हे मीठ खारट, पचण्यास जड, पित्तकर व कफवर्धक असते.
२) सैंधव - यालाच शेंदेलोण असे म्हणतात. हे उत्तम प्रतीच औषधी मीठ असत. ते पाचक, त्रिदोषनाशक व आरोग्यकारक असत. जर इतर मीठ वर्ज्य केले असेल तर सैंधव खायला हरकत नाही.
३) सौर्वचल - यालाच पादेलोण असेही म्हणतात. हे जमिनीतून मिळवल जात. त्याचा रंग फिकट गुलाबी असतो. ते तिखट, उष्ण असून उत्कृष्ट रेचकही  असते.
४) बीउलवण - याचा वापर औषधात केला जातो. ते उष्ण, रुक्ष पण रुचकर असते.
५) सांबरलवण - हे सांबर सरोवरातून मिळते. ते अधिक खारट, पित्तकारक व कफनाशकं असते.