सरदार वल्लभभाई पटेल 

            गुजरात राज्यातील पटेलाद तालुक्यातील करमसद नावाच्या गावी ३१ आक्टोबर १८७५ रोजी वल्लभभाईंचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांच नाव जव्हेरभाई तर आईचे नाव लाडबाई होत. त्यांचे थोरले भाऊ विट्ठलभाई हे कुशल संसदपटू होते.
               वल्लभभाईंनी इग्लंडला जाऊन प्रथम क्रमांकाने बॅरिस्टरची पदवी मिळवली आणि भारतात येऊन अहमदाबादमध्ये आपली वकिली सुरु केली. कुशल कायदेपंडित म्हणून नावलौकिक मिळवलेल्या वल्लभभाईंनी गांधीजींच्या विचाराने प्रभावित होऊन वकिली सोडून दिली. आणि देशस्वातंत्र्याच्या कार्यात ते सामील झाले. अहमदाबाद नगरपालिकेचे ते अध्यक्ष बनले. खेडा जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा सत्याग्रह तसेच नागपूरचा झेंडा सत्याग्रह यात ते सामील झाले होते. शेतकर्‍यांवरील जुलुम दूर करण्यासाठी त्यांनी बारडोली येथे १९२८ मध्ये सत्याग्रह केला. त्याला अपूर्ण यश प्राप्त झाले. या यशाबद्दल गांधीजींजी त्यांना 'सरदार' ही पदवी बहाल केली. १९३१ मधील कराची काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला.
           भारत स्वतंत्र झाल्यावर संस्थानिकांशी वाटाघाटी करून संस्थान भारतात विलिन करण्याच्या कामी वल्लभभाईंनी मोलाचे कार्य केले. त्यांच्या खंबीर नेतृत्त्वामुळेच त्यांना 'पोलादी पुरुष' असही म्हटल जात.१५ डिसेंबर १९५० रोजी या पोलादी पुरुषाचे निधन झाले.