इको फ्रेंडली गणपती करताना 

इको फ्रेंडली गणपती तयार करताना  कागद, टिश्यूपेपर, माती, वॉटरकलर, भाज्यांपासून तयार केलेले रंग, डिंकापासून बनविलेला गम, कापड इत्यादि साहित्य लागते.
१) कागद किंवा वर्तमानपत्र पाण्यात भिजवून लगदा करावा.
२) मंद आचेवर गम व पाणी यांचे मिश्रण गरम करावे.
३) हे मिश्रण थंड झाल्यावर गाळून मिश्रणातील गम वेगळा करावा.
४) गाळलेल्या गममध्ये कागदाचा लगदा एकत्रित करुन त्यात व्हाईट इंक पावडर घालावी व पावासारखे  मऊ मिश्रण तयार करावे.
५) हे मिश्रण साच्यामध्ये घालून प्रेस करावे. त्यामुळे साच्याचा आकार लगदयावर छापला जातो.
६) वरीलप्रकारे मागची व पुढची बाजू साच्यात भरुन घ्यावी.
७) त्यावर बायडिंग गमच्या मदतीने २-३ पेपर तुकडय्यांचे थर लावावे.
८) दोरी व गमच्या सहाय्याने साचा घट्ट बंद करावा.
९) साचा वाळल्यावर एकेक भाग काढून घ्यावे.
१०) पॉलिशपेपर किंवा मेटल फाइलच्या सहाय्याने मूर्तीला फिनिशिंग दयावे.
११) नतर हवे त्याप्रमाणे रंगकाम करावे.