स्वयंपाक घरातील गॅस (एल पी जी) 

            लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस म्हणजेच एलपीजी हा वायू आपण स्वयंपाक घरात वापरतो. यामध्ये प्रोपेन व ब्यूटेन या हायड्रोकार्बन वायूंचे ३०:७० या प्रमाणात मिश्रण असते. ठराविक दाबाखाले मिश्रणाला द्रवरूप बनवले जाते. व सुरक्षित टाक्यात भरले जाते. हा वायू रंगहीन व वासहीन असतो. पण त्यामध्ये अल्पप्रमाणात तीव्र वासाचे मर्केप्टाइन नावाचे रसायन मिसळलेले असते. त्यामुळे गॅस गळती झाल्यास वासामुळे आपल्याला समजते. ह्या वायूचे वैशिष्ट्य म्हणजे तो हवेच्या संपर्काशिवाय जळू शकत नाही. त्याचे हवेतील २ ते ९ टक्के प्रमाण ज्वलनास पोषक असते. त्यामुळे बंद टाकीतील गॅस जळण्याची शक्यता नसते.
           अशाप्रकारे एलपीजी हे सुरक्षित इंधन स्वयंपाक घराप्रमाणेच हिवाळ्यात खोल्या उबदार ठेवण्यासाठी, रेफ्रिजेटरचे इंधन म्हणून, औद्योगिक क्षेत्रातील प्रयोगशाळेत तसेच धातू जोडण्यासाठी व कापण्यासाठी वापरला जातो.