च्युइंगगम 

            च्युई म्हणजे चावणे. गम म्हणजे डिंक. वेगवेगळ्या झाडांचे चीक गोळा करून च्युइंगम तयार केले जाते. हे तयार करताना सुरवातीला डिंकाला जवळपास ११५० अंश सेल्सिअस उष्णता दिली जाते. त्यामुळे डिंकाचा घट्ट पाक तयार होतो. तो गाळला जातो. नंतर या घट्ट पाकात पिठीसाखर, मक्याचा रस, ग्लूकोज, खाण्याचा रंग, अन्न टिकवणारे पदार्थ मिसळतात. हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवले जाते. व त्याचवेळी त्या मिश्रणाला वेगवेगले आकार दिले जातात. पूर्वी चुईंगम रबरासरख्या चिकापासून बनवायचे. दुधासारख्या रंगाच्या या चिकाला चिकल असे म्हणत. मोक्सिको व मध्य अमेरिकेतील सॅपोडिल्ला नावाच्या झाडाच्या चीक त्यासाठी वापरत. पण आता चुईंगगम मेण, रबर व प्लॅस्टिक यापासून बनवलेल्या सिन्थेटिक गमपासून बनवण्यात येते. हा गम साखर व मक्याच्या द्रावात मिसळला जातो. मग तो कुकरमध्ये वितळवला जातो. हा द्राव रोलमध्ये घालून चपट्या वड्या करण्यात येतात. १९२८ मध्ये प्रथम याचे उत्पादन करण्यात आले.