आपला मोबाइल 

अगदी शाळेतल्या मुलांपासून आजी- आजोबांपर्यंत आणि चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यापासून वरिष्ठ
पदावरच्या अधिकार्‍यापर्यंत सार्‍यांच्या हातात मोबाइल विराजमान झालेला दिसतो. पण त्याबद्दलची
माहिती मात्र फारच थोड्या लोकांना असते. स्पेक्ट्र्म घोटाळ्यामुळे मोबाइलसंबंधी बरीच माहिती
वाचायला मिळाली.मुळात स्पेक्ट्र्म म्हणजे काय , मोबाइल सेवा कशी पुरवली जाते हे पहाणे आवश्यक
आहे.
आपल्याला बोलण्यासाठी आणि बोललेले ऐकण्यासाठी विशिष्ठ ध्वनीकंपनांची गरज असते. या ध्वनी
लहरी वाहून नेण्यासाठी विविध कंपन्यांना जो ठराविक पट्टा दिलेला असतो त्याला "स्पेक्ट्र्म" असे म्हणतात . आता "स्पेक्ट्र्म जी" असाही शब्दप्रयोग ऐकू येतो. त्यातील जी म्हणजे जनरेशन. मोबाइलमध्ये जसजशा सुधारणा होत गेल्या त्या "वन जी ", "टू जी ", "थ्री जी " अशा नावानी ओळखल्या जाऊ लागल्या.  १.] स्पेक्ट्रम वन जी :- ही सेवा केवळ बोलणे आणि एस.  एम्.एस. एवढ्यापुरतीच मर्यादित सेवा. यातील एस. एम. एस. म्हणजे "शोर्ट मेसेज सर्व्हिस" होय. संगणकाप्रमाणेच
इलेक्ट्रॉनिक पद्धतीने याचे कार्य चालते. ही सेवा ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाइल (जी. एस. एम.)संपर्क  सेवेच्या अंतर्गत सन१९८५ मध्ये सुरू झाली. २.]   स्पेक्ट्र्म टू जी :-  ही इंटरनेट मोबाइल सेवा जनरल पॅकेट रेडिओ सर्व्हीस (जी. पी. आर. एस् ). मार्फत पुरवली जाते. पण त्याचा स्पीड खूप कमी आहे.  ३.] स्पेक्ट्र्म थ्री जी :- ही अति वेगवान इंटरनेट सेवा आहे.याचे तांत्रिक नाव "इंटरनॅशनल मोबाइल टेलिकम्युनिकेशन २०००" असे आहे.या तंत्रज्ञानामुळे वाइड एरिया वायरलेसव्हॉइस टेलिफोन ,जीपीएस, लोकेशन बेस्ड सर्व्हीस, मोबाइल इन्टरनेट अ‍ॅक्सेस,  व्हिडिओ कॉलिंग, मोबाइल टि. व्ही., गेमिंग  अशा अनेक सुविधा त्यामार्फत पुरविल्या जातात.याची फ्रिक्वेन्सीही  अधिक आहे. या सेवेचा पहिला वापर २००१ मध्ये युरोप, जपान, चीन येथे करण्यात आला. भारतात ती सन २००८ मध्ये "बीएसएनएल" नेचालू केली. जपानमधील "एनटीटी डोकोमो" या कंपनीने याचा शोध लावला. ४.] एस. बँड :- ज्या रेडिओलहरींची  फ्रिक्वेंसी  २ ते ४ गीगा हटर्झ मध्ये आहे; त्यांना एस. बँड  असे म्हणतात. याचा उपयोग हवामान रडार, समुद्रावरील जहाजाचे                                                     
    रडार, व सूचना  पाठवण्यासाठी असलेल्या सॅटेलाइटसाठी केला जातो. याच्या मार्फत थ्री जी  सॅटेलाइट
 मोबाईल सेवाही उपलब्ध करता येईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.                                                        भारत सरकारने कोणत्याही टेलिकॉम व्यवहारासाठी "टेलिकॉम रेग्युलॅतोरी अ‍ॅथोरिटी"ही स्वायत्त यंत्रणा
 नेमलेली आहे. " ट्राय "  या नावाने ती ओळखली जाते. भारतात दोन प्रकारची मोबाइल सेवा उपलब्ध
आहे.  १.] जी. एस. एम :- या प्रकारात बोललेला आवाज जसाच्या तसा टॉवर आणि इच्छित मोबाइल
धारकाकडे परावर्तीत  होतो. २.]  ड्ब्लू. आय. एल. एल. :- या प्रकारात बोललेला आवाजाच प्रथम वेगळ्या
स्वरूपाच्या लहरीत परावर्तन होत. मग त्या लहरी टॉवरकडे जातात. आणि मग त्या  इच्छित मोबाइल धारकाच्या  हॅण्डसेट्मध्ये ते शब्द  मूळ स्वरूपात ऐकू येतात.                                          त्यामुळे आवाज स्पष्टऐकू येतो. मोबाइल कंपन्यांना या दोन्ही पधतीने सेवा देण्याच्या पद्धतिला "युनिफाइड लायसन्स" असे संबोधले जाते.                                                                         
आपल्या मोबाइलमध्ये सिमकार्ड बसवलेले असते. त्याशिवाय आपला मोबाइल चालऊच शकणार नाही.
           'सबस्क्रायबर आयडेन्टीटी मॉड्यूल' म्हणजे 'एस.आय.एम.' हेच आपल्या मोबाइल मध्ये बसविलेले  सिमकार्ड होय. या कार्डमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण क्रमांक असतो. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोबाईल वापरणार्‍या  ग्राहकाचा गुप्त क्रमांक असतो. शिवाय स्थानिक माहितीची  देवाणघेवाण करण्यासाठी त्यात एक क्रमांक समाविष्ट असतो. आणि माहितीच्या रक्षणासाठी सुरक्षा यंत्रणा असते.
            ही कार्डे दीन प्रकारची असतात. १) क्रेडीट कार्डाच्या आकाराचे म्हणजे ८५.६० मिमी X ५३.९८ मिमी X ०.७६ मिमी एवढे असते. २) हे छोट्या आकाराचे कार्ड २५ मिमी X १५ मिमी X ०.७६ मिमी एवढे असते.जागतिक स्तरावरील मोबाइल संपर्कासाठी सिमकार्डाची आवशक्यता आसते.
           एका मोबाइलमध्ये सिमकार्ड काढून दुसर्‍या मोबाइलमध्ये घालून आपला मोबाईल बदलता येतो. त्यामुळे मोबाइलचे मॉडेल बदलले तरी नंबर तोच रहातो. आता तर मोबाइल कंपनी बदलली तरी
आपला नंबर तोच रहाण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे. यालाच एम. एन. पी. म्हणजेच मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी असे म्हटले जाते.