विषारी सर्प 

            १) फुरसे--->  भारतात सर्वत्र आढळणारा हा सर्प आक्रमक असतो. तो अंडी न देता पूर्ण वाढ झालेल्या पिल्लांना जन्म देतो. याचा रंग बदामी, तपकिरी मातकट असून त्याच्या पाठीच्या मध्यावर लहान पांढर्‍या चौकड्या असतात. याच्या डोंक्याचा आकार लांबट व त्रिकोणी असून ते रुंद असते. फुरशाची शेपटी लहान असून निमुळती होत गेलेली असते. इंग्रजी आठ आकाराचे वेटोळे करून तो रहातो सर्व विषारी सर्पांमध्ये फुरसे आकाराने लहान असते. फुरसे नेहमी आपले भक्ष दिवसा शोधते . उंदराची व बेडकाची पिल्ले, विंचू हे त्याचे अन्न असते. त्यांच्या दातांची लांबी जास्त असते. पण विषग्रंथी मात्र लहान असतात.
२) घोणस ---> साधारण साडेपाच फूट लांबी असणारा हा सर्प समुद्रसपाटीपासून पर्वतापर्यंत कोठेही आढळतो. घनदाट जंगलात मात्र तो वास्तव्य करत नाही. बदामी, तपकिरी रंगाच्या याच्या अंगावर काळपट रंगाचे डाग असतात. याच्या डोक्यावर  बाणाच्या टोकाप्रमाणे दिसणारी खूण असते. डोके चपटे व त्रिकोणी असते. याच्या ओठांच्या दोन्ही कडांपासून गालापर्यंत करड्या पिवळसर रंगाच्या दोन रेषा असतात. त्याच्या नाकपुड्या मोठ्या असतात. याच्या डोळ्यांची बुब्बुळे गोल व आतील बाहुल्या उभ्या असतात. घोणसाची शेपटी आखूड असते. याचे दात खूप मोठे असल्याने एकाच दंशात बरेच विष बाहेर येते. आपल्या जीवाला धोका आहे असे समजताच तो अंगाचे वेटोळे करून रहातो. याच्या फुत्कारण्याचा आवाजही मोठा असतो.
३) मण्यार --->  भारतात सापडणार्‍या सर्व सर्पात सर्वाधिक विषारी सर्प म्हणजे मण्यार. मनुष्यवस्तीच्या आसपास, घराच्या छपरात, पाण्याच्या साठ्याजवळ हा रहातो. निशाचर असणारा हा सर्प लाजरा बुजरा आणि मुद्दाम कोणाला दंश न करणारा असा आहे. पण याचे विष जहाल असते याची लांबी जवळजवळ सव्वा मीटर असून अंग बारीक असते. याचा रंग काळा असून मध्येमध्ये पांढर्‍या कमानी असतात. मानेच्या बाजुला पांढरे ठिपके असतात. याचे तोंड वेटोळे व ओठ पांढरट असतात. याच्या डोळ्यांची बुब्बुळे रंगहीन असून बाहुल्या गोल असतात मण्यार एकावेळी आठ ते दहा अंडी देते ती दोन सेमी जाड व चार सेमी लांब असतात.
४) नाग --->  पडीक घरे, मोडकी देवळे, वारूळे हे नागाचे निवासस्थान असते. याचा रंग पिवळसर असून अंगावर काळया रंगाच्या चंद्रकोरीप्रमाणे दिसणार्‍या कडा असतात. काहीवेळा तपकिरी व काळ्या रंगाचे नागही आढळतात. याचे डोके माणसाच्या अंगठ्यासारखे पुढून पसरट व गोलाकार असते. नाग आपला फणा उभारतो; तेंव्हा त्यावर दहाच्या आकाड्यासारखी खूण दिसते. या फण्याच्या पुढच्या बाजुला काळा व सफेद डाग दिसतो आणि फण्याच्या खाली काळे पट्टे असतात. याचे डोळे मोठे असून बाहुल्या वाटोळ्या असतात. नागाचे शरीर सर्वत्र सारख्याच जाडीचे असते व शेपटीच्या बाजूला जाडी कमी होत जाते.
५) किंग कोब्रा किंवा नागराज --->  जगातील सर्वात विषारी साप म्हणून नागराजाची ओळख सांगता येईल. हा सर्प आकाराने मोठा असून त्याच्या विषग्रंथीही मोठ्या असतात. याचे दात तीक्ष्ण व लांब असतात. हिमालयाचा परिसर, आसाम, दक्षिण भारतातील घनदाट जंगले, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, ब्रह्मदेश, याठिकाणी तो सपडतो. नागराज काळसर हिरवट तपकिरी रंगाचा असतो. त्याच्या अंगावर गडद रंगाची कडी असतात. याच्या डोक्याचा रंग हिरवट पिवळसर असतो. याचा गळा फिकट पिवळसर किंवा नारिंगी रंगाचा असतो. याच्या नाकपुड्या व डोळे मोठे असतात. शेपटीही लांब असते नागराजाला डिवचल्यास तो आपले शरीर जमिनीपासून बरेच वर उचलतो. आणि मानेखालचा भाग फुलवतो. अतिशय आक्रमक असणारा हा सर्प बर्‍याचवेळा विनाकरण हल्ला चढवतो.
६) समुद्रसर्प --->  खडकाळ समुद्रकिनारा असणार्‍या ठिकाणी समुद्रसर्प आढळतात. ते सव्वा मीटर लांब असतात. निळसर रंगाच्या या समुद्रसर्पाच्या शरीरावर काळसर रंगाची कडी असतात. याच्या पोटाच्या रंग पिवळा असतो. याचे डोळे बारीक असतात. शेपटी चपटी व तोंड खालच्या बाजुला वळलेले असते.
७) हरा नाग - साधारणत; डोगराळ भागात आढळणारा हा सर्प हिरव्या रंगाचा तर व्कचित पिवळसरही असतो. याच्या पोटाकडचा भाग पांढरा, हिरवा किंवा पिवळा असतो. याची शेपटी पिवळसर किंवा कधी लालसर असते. याच्या डोक्यापासून शेपटीपर्यंत पांढर्‍या पिवळ्या रंगाच्या दोन ठळक बारीक रेषा गेलेल्या दिसतात. याचे डोके चपटे व आखूड, त्रिकोणी असते. याचे विषदंत गळ्याकडच्या बाजुला असतात. पण ते चावण्यासाठी वापरले जात नाहीत. तो प्रथम तोंडात विष आणतो व मग शत्रूच्या जखमेत सोडतो.
            झाडावर राहणार्‍या नागाला सर्पटोळ किंवा हरणटोळ म्हणतात. तो लांब चोचीसारख्या तोंडाचा व बारीक असतो.


Snake

There are over 3000 kinds of snake in the world. Except Antarctica, snakes are found in almost all corners of the world. Snakes come in many shapes, sizes and colors, and their appearance reflects the environment in which they live. Some of the amazing facts of snake are that they don’t have ears, they don’t blink their eyes. Without legs, eyelids and external ears, they have still evolved into formidable hunters Vine snakes are remarkable because they appear to have binocular vision. The King Cobra can administer 350-450 milligrams of venom in a single bite, enough to kill 10-13 adult humans or a large elephant. Snake venom is used for the production of life-saving medicine. The biggest snake is the Reticulated Python. It can grow up to 10.05 meters or 33 feet long and the thickest snake is the Anaconda. A reticulated python, named Colossus, was the largest snake that ever lived in a zoo. She lived at the Pittsburgh Zoo in Pennsylvania. Clifford Pope, the author of a book entitled “The Giant Snakes” reported that she was 22 feet long when she was captured in what is now Thailand in 1949. Eight years later she grew to 29 feet long. Her body was 69 cm around and her weight was around 145 kg.