मार्क ट्वेन 

            सॅम्युएल लँघॉन क्लेमेन्स हे मार्क ट्वेनचे खरे नाव. ३० नोव्हेंबर १८३५ मध्ये सॅम्युएलचा जन्म झाला. तो लहान असतानाच वडिलांचा स्वर्गवास झाला. आणि सॅम्युएलवर पैसे कमावण्याची जबाबदारी आली. त्याने पहिली नोकरी स्वीकारली ती 'हनिबल' या वर्तमानपत्राच्या सहसंपादकाची. अमेरिकेतील या प्रसिद्ध लेखकाने आपल्या या पहिल्या नोकरीच्या ठिकणी लाकूड तोडून फायरप्लेस पेटवणे, भांडी घासणे, जेवण करणे, कार्यालय साफ करणे अशा कामांबरोबरच छपाईचे काम केले. त्याने दुसरी नोकरी केली ती'क्वानिकल' या वृत्तपत्रामध्ये. परंतु येथेही संपादकाबरोबर वाद होऊन ती नोकरी त्याला सोडावी लागली. पुढे व्हर्जिनिया शहरात त्याला वार्ताहराची नोकरी मिळाली. त्या संपादकांनी  आपले नाव बदलून लिखाण करावयास सुचवल्याने  ३ फेब्रु. १८६३ पासून त्यांनी 'मार्कट्वेन' या नावाने लेखन सुरु केले.
           मार्कट्वेन यांनी अमेरिकन साहित्यात प्रथमच बोली भाषा वापरून विनोदी शैलीत लिखाण करण्यास सुरुवात केली. 'लाईफ ऑन द मिसिसिपी', 'रफिंग इट', 'दि गिल्डेड एज' ही त्यांची पुस्तके खूप गाजली. त्याच्या 'टॉम  सॉयर' आणि 'हकलबेरी फिन' या कादंबर्‍यांमुळे अमेरिकन साहित्याचा चेहरा मोहराच बदलून गेला.
             सन १८७० मध्ये ट्वेन आणि ऑलिव्हिया यांचा विवाह झाला. आणि पुढे त्यांना सुझी, क्लार व जिअ‍ॅ नावाची मुले झाली. परंतु सन १८९६ मध्ये सूझी मॉनिनजायटिसने मरन पावली; तर त्यांची पत्नी १९०४ मध्ये आणि १९०९ मध्ये जिअँ यांचा मृत्यू झाला. या दुं:खद  काळात त्यांनी 'इनोसंट्स अ‍ॅब्रोड' नावाची कादंबरी लिहिली. प्रवासवर्णन रूपात असलेली ही कादंबरी खूप लोकप्रिय झाली. त्यातून त्यांना महिना १०००  डॉलर मिळू लागले. २१ एप्रिल सन १९३० मध्ये या जगप्रसिद्ध लेखकाचा मृत्यू झाला.