बटाटा 

            लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांना प्रिय असा हा बटाटा. अँडिज पर्वताच्या कुशीत वाढला आणि मग जगभर पसरला. नुसता उकडून खा, भाजून खा, भाजी आमटीत घाला, पराठे बनवा, वेफर्स, चिवडा करा तो चविष्टच लागतो.त्याचे पोषणमूल्यही चांगले असते. बर्फाळ प्रदेशापासून उष्ण कटिबंधा पर्यंत कोठेही लागवड करता येईल असे हे पीक आहे. शिवाय जास्तीत जास्त ९० दिवसात ते तयार होते. बटाटयाच्या पिकाबाबत गमतीचा भाग असा की बटाटा सोडून त्याच्या झाडाचे इतर सर्व भाग विषारी असतात. बटाटयाच्या सुमारे ७५०० जाती आहेत. लाल सालीच्या बटाट्यापासून लाल, काळ्या रंगाचे बटाटेही असतात. तसेच लिंबाएवढा लहान बटाटा जसा असतो; तसा अर्धा किलोचा एक एवढया मोठ्या आकाराचा बटाटासुदधा पहायला मिळतो.
            दक्षिण अमेरिकेत तितिकाका सरोवराच्या आसपास म्हणजे पेरु आणि बोलिव्हियाच्या भागात सुमारे सात आठ हजार वर्षापूर्वीपासून बटाट्याची मुबलक लागवड करण्यात येत होती. तेथे इंका संस्कृतीचे लोक रहात. त्यानी या बटाट्याची लागवड पुढे शास्त्रशुदध पद्धतीने करायला सुरुवात केली. त्याच्या विविध जाती त्यानी तयार केल्या. सन १५३२-३६ च्या दरम्यान स्पॅनिश लोक पेरु मध्ये गेले आणि त्यानंतर जगाला त्यांनी बटाट्याची ओळख करुन दिली. तोपर्यंत उत्तर अमेरिकेत लोकांनाही बटाट्याची माहितीही नव्हती. आता तर १९९५ मध्ये नासाने अंतराळातही बटाटे उगवण्याचा यशस्वी प्रयोग केल्याचे वाचनात आले.
            इतर भाज्यांच्या तुलनेत बटाट्यात उष्मांक जास्त असतात. १०० ग्रॅम बटाट्यामध्ये २०-२२ ग्रॅम पिष्टमय पदार्थ, १-६ ग्रॅम, प्रथिने, तंतुमय पदार्थ, 'क' व 'ब' गटातील जीवनसत्त्वे, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे खनिज पदार्थ भरपूर प्रामाणात असतात.
            पूर्वीच्या काळी इंका लोक शरीराची तुटलेली हाडे लवकर जुळून यावीत म्हणून त्यावर कच्च्या बटाट्याच्या चकत्या ठेवत. बटाटा जवळ बाळगल्याने सांधिवात होत नाही असे ते म्हणत. बटाट्याने  अपचन होत नाही;  अशीही त्यांची समजूत होती. आज बटाट्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. काही देशात गुरांचे व डुकरांचे खाद्य म्हणूनही बटाटा वापरतात. बटाट्याच्या सालीपासून इथेनॉल हे जैविक इंधन तयार करता येते. प्लॅस्टिकचा पर्याय म्हणूनही बटाट्याच्या स्टार्चकडे पाहिले जाते.


Potato

The English word potato comes from Spanish patata (the name used in Spain) The potato is a starchy, tuberous crop from the perennial Solanum tuberosum of the Solanaceae family. It is the world's fourth-largest food crop, following rice, wheat, and maize. The annual diet of an average global citizen in the first decade of the 21st century included about 33 kg (73 lb) of potato. It remains an essential crop in Europe, however China is now the world's largest potato-producing country, and nearly a third of the world's potatoes are harvested in China and India. There are close to 4000 different varieties of potato. Due to carbohydrate and fat content, potatoes are considered to make a person obese if used in excess. Research by the University of California, Davis and the National Center for Food Safety and Technology, Illinois Institute of Technology demonstrates that people can include potatoes in their diet and still lose weight. Potatoes are used to brew alcoholic beverages such as vodka, potcheen, or akvavit. Also used as food for domestic animals. Potato starch is widely used in the food industry. There are several Potato museums around the world some of them are in Canada, Belgium, and Germany.